No Social Distancing in Market yard due 15 days Lock down Fear and Gudhi padwa  
पुणे

पुणेकरांनो, किती हा निष्काळजीपणा? मार्केटयार्डात नागरिकांची झुंबड

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातच शहरासह राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी भाजीपाला, फळे, किराणा, धान्य खरेदीसाठी मोठी गर्दी उसळलेली होती. गुढीपाडव्यासाठी आंबे, फुले आणि किराणा खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

दरम्यान, शिवनेरी पथ रस्त्यावर सकाळपासूनच वाहतूक कोंडी आहे. बाजार समिती कर्मचारी सकाळ पासून गर्दी कमी करणे, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी करत आहेत. परंतु गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्यांची ही दमछाक झाली आहे. 

हे वाचा - पुण्यावर मोदी सरकारची अवकृपा; लशीचे डोस दिलेच नाहीत!

लॉकडाऊन जाहीर होण्याच्या भितीने शहरातील सामान्य नागरिक, व्यापारी यांची बाजारात झुंबड उडाली आहे. नागरिक पंधरा दिवसांच्या भाजीपाला, फळे खरेदी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजार सुरुळीत सुरू होता. परंतु आज गर्दीमुळे कुठे काय चालू आहे काहीही समजत नाही. नागरिकांना भाजीपाला, फळे, अन्न धान्य मिळण्यासाठी मार्केट यार्डात नियमित सुरू राहण्याची गरज  असल्याचे मत मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Donation Scam: राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात खळबळजनक प्रकार उघड, कर्मचाऱ्याने घरात शेणाच्या ढिगाऱ्यात लपवले १० लाख रुपये

INDW vs PAKW: T20 World Cup आज रंगणार सर्वात मोठा थरार! भारत-पाकिस्तान मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? वाचा सविस्तर

Maharashtrachi Hasyajatra: प्रेक्षकांचा आग्रह सोनी मराठीने मानला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'बाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

Alandi Waste Crisis: आळंदी घनकचरा डेपोवर वारंवार कचरा जाळला; करोडो खर्च असूनही स्वच्छता व सुरक्षा यंत्रणा ठप्प

ना मुलगा ना मुलगी... 'याच्या' नावावर करणार सगळी संपत्ती; गोविंदा यांच्या पत्नीने पॅपराजींसमोर केला खुलासा!

SCROLL FOR NEXT