Pune Traffic Update sakal
पुणे

Pune Traffic Update : खडकीकडे जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून आता दुहेरी वाहतूक

जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील खडकीकडे जाणारा रस्ता असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर आता दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे. मागील तीन वर्षापासून सुरू असलेले मेट्रोचे काम तसेच रस्ता रुंदीकरणामुळे हा मार्ग एकेरी करावा लागला होता.

सकाळ वृत्तसेवा

शिवाजीनगर : जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील खडकीकडे जाणारा रस्ता असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर आता दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे. मागील तीन वर्षापासून सुरू असलेले मेट्रोचे काम तसेच रस्ता रुंदीकरणामुळे हा मार्ग एकेरी करावा लागला होता. यामुळे खडकी मुख्य बाजार येथे अडचण निर्माण होत होती. ती अडचण आता दूर झाली आहे.पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

मधल्या काळामध्ये नागरिकांशी बोलून, स्थानिक वाहतूक पोलीस यांना विश्वासात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग दुचाकी आणि तीनचाकी यांच्यासाठी आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी दुहेरी करून घेतला होता. तरीही खडकीच्या मुख्य बाजार परिसरात खूप मोठी अडचण सर्वच नागरिकांना आणि तेथील व्यापाऱ्यांना सहन करावी लागत होती.

मात्र, आता चर्च चौक ते बोपोडी चौक आणि बोपोडी चौक ते खडकी बाजार मार्ग हा होळकर पुलापर्यंत एल्फिस्टन रस्त्यावर आता दुहेरी वाहतूक सुरु झाली आहे. तसेच, चर्च चौक ते आयुध चौक दरम्यान जनरल थोरात मार्गावर दुहेरी वाहतूक सुरु करण्यात येत आहे.

आमदार शिरोळे म्हणाले, “जुन्या पुणे मुंबई महामार्गाच्या रस्ता रुंदीकरण कामाची गती देखील वाढविण्यास प्रयत्न केले जात आहेत. आता वरील मार्ग वाहतुकीस दुहेरी खुले झाल्याने खडकी बाजारातली व्यापारी, नागरिक यांना दररोजच्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे.

मेट्रोचे काम सुद्धा पूर्ण झाले आहे आणि आता लवकरच जय हिंद टॉकीजविषयी न्यायालयाने मार्ग सुकर केल्याने रस्ता लवकरच पूर्ण होईल. स्थानिक नागरिक पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून विकास कामांना यश मिळत आहे. मागील ५ वर्षात खडकी भागात ५ कोटी रुपये आणि बोपोडी भागात ६ कोटी रुपये विकासकामांसाठी मंजूर करून घेतले असून त्यानुसार अनेक कामे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : महानगरपालिकांच्या महापौरपदासाठीच्या आरक्षणाची सोडत येत्या गुरुवारी जाहीर होणार

VIDEO VIRAL : धक्कादायक! बड्या आयपीएस अधिकाऱ्याचे ऑफिसमध्येच महिलेसोबत अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाला दिले चौकशीचे आदेश

Satara Crime: जावलीच्या युवकाची दहा लाखांची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा, सरकारी नोकरीसाठी आईचे दागिने बॅंकेत अन्..

Satara politics: खासदार उदयनराजे, मंत्री शिवेंद्रराजेंची खलबते! खेड, कोडोली, शेंद्रे, नागठाण्यासाठी उदयनराजे गट आग्रही, नेमकं काय ठरलं?

मोठी बातमी! शिक्षकांना दोन वर्षांत ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावीच लागणार; शालेय शिक्षण विभागाने मागितली माहिती; शिक्षणाधिकाऱ्यांचे मुख्याध्यापकांना आदेश

SCROLL FOR NEXT