वाकड - शो नेस्ट सोसायटीमध्ये रहिवाशांकडून आपापल्या माजल्याची सफाई करण्यात येत आहे. 
पुणे

Coronavirus : ...आता सोसायट्यांमधील नागरिकांचाच स्वच्छतेसाठी पुढाकार

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - कोरोनाच्या धास्तीमुळे सोसायट्यांमध्ये काम करणारे अनेक सफाई कामगार त्यांच्या गावी गेले आहेत. त्यामुळे  मनुष्यबळाअभावी सोसायट्यांमधील नागरिकांनीच स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे.

शहरातील अनेक मोठ्या सोसायट्यांमध्ये खाजगी एजन्सीद्वारे सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोसायटीच्या आवारातील घरामधली इमारतीसाठी एक याप्रमाणे कामगारांना नेमण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या धास्तीमुळे अनेक कामगार त्यांच्या मूळ गावी निघून गेले आहेत. त्यामुळे  स्वच्छता कशी राखायची असा प्रश्न या सोसायटीतील रहिवाशांना पुढे होता. मात्र प्रत्येक इमारतीच्या एका मजल्यावर जेवढे सदनिकाधारक असतील त्यांनी आलटून पालटून त्या त्या मजल्याची सफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणीही गेल्या आठवडाभरापासून सुरू झाली आहे.

यासंदर्भात पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या अध्यक्षा तेजस्विनी सवाई  यांनी सांगितले, वाकड येथील आमच्या शोनेस्ट या सोसायटीमध्ये एकूण आठ इमारती आहेत. प्रत्येक इमारतीला बारा मजले आहेत. प्रत्येक मजल्यावर पाच सदनिकाधारक आहेत. सामान्यपणे या सर्व इमारतींसाठी  रोज आठ जण कार्यरत असतात.

मात्र गेले तीन-चार दिवस त्यासाठी केवळ दोघे कामगार उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक मजल्याची सफाई  त्या मजल्यावरील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. तसेच ओला-सुका आणि धोकादायक कचरा टाकण्यासाठी इमारतीखाली तीन स्वतंत्र डस्टबिन ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक नागरिक या डस्टबिनमध्येच त्या त्या प्रकारचा कचरा टाकत आहे. याबाबत फेडरेशनच्या सर्व सभासदांना कळवण्यात आले आहे. अशाच प्रकारे अन्य सोसायट्यांमध्ये तेथील नागरिकांकडून सफाईची कामे करण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'तू माझ्यासाठी सर्वात मौल्यवान...'; कतरिना कैफची पोस्ट चर्चेत, मुलगा विहानची सुद्धा दाखवली झलक

FIFA World Cup 2026 Final: अर्जेंटिनाचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य! फायनलआधी रॉड्रीने उघड केला स्पेनच्या विजयाचा सीक्रेट प्लॅन

Live Updates Marathi: एकनाथ शिंदे यांचा चंद्रभागेत नौकविहार

Maharashtrian Recipe: तिखट खायला आवडतं? घरीच बनवा झणझणीत,सुकी लाल मिरची चटणी!

Pune News: कॅनॉलच्या कठड्यावर लटकलेल्या चारचाकी गाडीतील चालकाला उरुळी कांचन पोलिसांनी शिताफीने सुखरूप बाहेर काढले

SCROLL FOR NEXT