Now only mild punishment in Pune University Charging fine  
पुणे

पुणे विद्यापीठातून चुकीला आता सौम्य शिक्षा; पण...

ब्रिजमोहन पाटील

पुणे : परीक्षेच्या कामात चूक आढळल्याने महाविद्यालयास पुढची दोन वर्ष कोणताही पुरस्कारासाठी अर्ज करता येणार नाही, तसेच विविध योजनांमधील निधीचा लाभ घेता येणार नाही असा कडक निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला होता. मात्र, यात अनेक महाविद्यालयांना फटका बसल्याने संस्थांच्या दबावापुढे विद्यापीठाला नमते घेतले असून, ही शिक्षा आता सौम्य करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेतला आहे. आता केवळ दंड आकारला जाणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुणे विद्यापीठाकडून परीक्षा झाल्यानंतर महाविद्यालयांकडून अंतर्गत गुण मागितले जातात. पण ही  माहिती व्यवस्थित संकलित न करणे, गुण देताना चूका करणे, बेरीज चुकने, सरकारी काढताना तसेच इतर प्रकारच्या चूका होतात. यामुळे इतर यंत्रणा कामाला लागले. त्यामुळे पुणे विद्यापीठाने सुमारे तीन वर्षांपूर्वी थेट महाविद्यालयास शिक्षा करण्याचा निर्णय घेतला गेला. 
-----------
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दोन दहशतवाद्यांचा खात्मा; आठवड्याभरात ११ ठार
-----------
धक्कादायक! आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू
----------
फेक बातम्यांच्या धर्तीवर सरकारच करणार आता फॅक्ट चेक; कसं ते वाचा?
-----------

अशी होती शिक्षा

सप्टेंबर २०१८ पासून या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यात १० किंवा १० पेक्षा कमी विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण भरायचे राहून गेल्यास प्रति विद्यार्थी १ हजार किंवा कमीतकमी कमी ५ हजार रुपये दंड व महाविद्यालयाच्या पुरस्कार, गुणवत्ता सुधार योजनेतील निधीचा फायदा, १० टक्के वाढीव जागा याचा दोन वर्ष फायदा घेता येणार नाही. तर चुक करणाऱ्या संबंधित प्राध्यापकास ही दंडाची शिक्षा करून, लेखी व प्रॅक्टीकल परीक्षेचे पेपर सेटिंगचे अध्यक्षपद न मिळणे, पुरस्कारासाठी अपात्र ठरवले जात होते. 

अभियांत्रिकी महाविद्यालयांना जास्त फटका
अतंर्गत गुण देताना चूक आढळल्याने त्यात सुधारणा करण्यासाठी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागत होती. त्यामुळे गुण देताना प्राध्यापकाकडून चूक झाल्यास त्यास संपूर्ण महाविद्यालयास दोषी पकडले जात होते. त्यामुळे उत्कृष्ट काम करणारे अनेक प्राध्यापक विद्यापीठाच्या पुरस्कारासाठी अपात्र ठरले. गुणवत्ता सुधार योजनेतून महाविद्यालयास लाभ मिळाले नाहीत. गेल्या तीन वर्षांत या नियमांचा सर्वाधिक फटका अभियांत्रिकी महाविद्यालयांना बसला आहे. 

चुकीचे गुण दिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते, त्यामुळे याबद्दल शिक्षा झाली पाहिजे. पण त्यासाठी संपूर्ण संस्थेला जबाबदार धरणे योग्य नव्हते. या नियमांमुळे अनेकांना संधी गमवावी लागली होती. त्यामुळे जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली होती. त्यास अखेर विद्यापीठाने मान्यता दिली.- शामकांत देशमुख, अधिसभा सदस्य, पुणे विद्यापीठ

अंतर्गत गुण देताना चूक झाल्यास महाविद्यालयास अनेक लाभासाठी अपात्र ठरवले जात होते. आता हा नियम रद्द झाला आहे. महाविद्यालय, प्राध्यापक पुरस्कारासाठी अर्ज करू शकणार आहेत. गुण देताना चूक झाल्यास प्रत्येक चूकीला १ हजार रूपये दंड केला जाणार आहे.- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT