Now Plenty vegetables are available in market yard pune 
पुणे

पुणेकरांनो, भाजीपाला साठवू नका कारण...

सकाळवृत्तसेवा

मार्केटयार्ड(पुणे) : गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी ( ता.२९) टेम्पो, पिकअपमधून ५१४ गाड्यांच्या शेतीमालाची आवक झाली. तसेच बाजार समितीच्या उपबाजार आवारासह एकूण ८५९ गाड्यांची आवक झाली. त्यामुळे पुण्याच्या गरजेच्या एकूण ८० ते ८५ टक्के भाजीपाल्याची आवक झाली आहे. शहरात मुबलक भाजीपाला उपलब्ध झाला आहे. नागरिकांनी भाजीपाला साठवण्याची गरज नसल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी जे. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशमुख म्हणाले, कामगार, अडते, कामगार यांनी बाजार चालवण्यासाठी सहकार्य करण्यास सुरुवात केली आहे. रात्री ९ ते पहाटे ४ वाजेपर्यंत शेतीमाल बाजारात आला. आलेला सर्व शेतीमाल गेट नंबर ४ वरून सर्व गाड्या आत सोडल्या. तसेच साधारणतः १५०० तीन चाकी टेम्पो मधून शेतीमाल शहरात पाठवण्यात आला. बाजारात गर्दी होऊ नये म्हणून बाजार समितीचे सर्व कर्मचारी आणि १२०-१३० पोलिसांचा फौजफाटा होता. त्यामुळे बाजारात आवारात घाऊक खरेदीदारांना ओळखपत्र बघूनच आत सोडले. त्यामुळे इतर कोणालाही बाजारात प्रवेश दिला नाही. तसेच सुरक्षित अंतर ठेऊन सर्व बाजार सुरळीत चालू होता. बाजार समितीच्या उत्तम नियोजनामुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे मार्केट यार्ड नियमित सुरू झाले आहे.

लॉकडाऊन असताना वाहनांतून नेण्यात येत होते कामगारांना; पोलिसांनी पकडले अन्...

समितीच्या मुख्य बाजारात, उपबाजार मांजरी, मोशी, उत्तम नगर, पिंपरी येथे एकूण ८५९ गाड्यांची आवक झाली. त्यामुळे शहरातील नागरिकांची यामध्यमातून भाजीपाल्याची गरज भागणार आहे. अडते असोसिएशने बाजार बंदची भूमिका घेतली असली तरी बाजार समितीने आवाहन केल्यानंतर बरेच अडते आणि कामगार बाजारात आले. तसेच नागरिकांनी बाजारात गर्दी करू नये. नियमित गुळ भुसार, फळे, भाजीपाला विभाग सुरू राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी देशमुख यांनी केले.
 Coronavirus : वाहतूक शाखेकडून रिक्षांना मिळतेय परवानगी; पण...   
डमी बाजारात; अडते घरी
बाजार समितीने मार्केट यार्ड सुरू करण्याची भूमिका घेतल्या नंतर रविवारी तरकरी भाजीपाला बाजारात बहुसंख्य डमी विक्रेते होते. डमी विक्रेत्यांनी बहुतांशी शेतीमाल विकला. अडते असोसिएशने बंदची भूमिका घेतल्याने रविवारी डमी विक्रेते बाजारात आणि अडते घरी असल्याचे चित्र पाहवयास मिळाले.

शेतकऱ्यांच्या गरजेच्या काळात अडते घरी
सध्या कोरोनामुळे राज्यात अनेक ठिकाणी बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल जाग्यावर खराब होत आहे. अशा कठीण काळात अडत्यांनी शेतकऱ्यांना व शासनाला सहकार्य करण्याची गरज असताना अडते मात्र, बाजार बंद करून घरी बसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT