पुणे

आंबेगाव तालुक्याला धोक्याची घंटा; मार्चमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढली

डी. के.वळसे पाटील

मंचर : आंबेगाव तालुक्यामधील घोडेगाव, माहाळूंगे पडवळ, अवसरी खुर्द, मंचर ही चार गावे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. बुधवारी (ता. १८) ४७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. (ता. 1 मार्च) पासून अत्तापार्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७५ पर्यंत पोहोचली आहे. बाधित रुग्णांची वाढती संख्या ही धोक्याची घंटा असल्याची चर्चा आरोग्य क्षेत्रात सुरु झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनही चिंतेत पडले आहे. 

जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने अनेक खासगी हॉस्पिटलमधील कोरोना उपचार केंद्र बंद झाली आहेत. कोरोनाची लागण आटोक्यात आल्याचे व प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्यामुळे लग्नसमारंभ, दशक्रिया व अन्य कार्यक्रमात गर्दीचे प्रमाण वाढले. प्रवासी वाहतूक वाहने व व्यावसायिकांनीही सोशल डिस्टन्सकडे दुर्लक्ष केले. त्यातूनच संसर्ग वाढत गेला. वाढती रुग्णसंख्या कशी राखायची याविषयी प्रशासनाने जोरदार उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मंचर, घोडेगाव, महाळुंगे पडवळ, अवसरी खुर्द या चार गावात प्राधान्याने घरोघर जाऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश तहसीलदार रमा जोशी व आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिले आहेत. मंचरचे सर्वेक्षण सुरु झाले आहे. पोलिस यंत्रणाही अलर्ट झाली आहे. विनामास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई सुरु केल्याची माहिती मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे व घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली.

आंबेगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असलेल्या गावातील सर्वेक्षणाचे काम सुरु केले आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आंबेगाव तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी केले आहे. (ता. 1 मार्चपासून) सरासरी १० ते १२ रुग्ण रोज आढळत होते. पण बुधवारी ४७ कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या पाच हजार ३०३ झाली आहे. चार हजार ९६० रुग्ण बरे झाले आहेत. १२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २२२ रुग्ण उपचार घेत आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात होणारी गर्दी टाळली पाहिजे. प्रत्येकाने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण डोस घ्यावा. साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने काळजी घ्यावी. -संजय गवारी, सभापती, आंबेगाव तालुका पंचायत समिती. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT