जुन्नर (पुणे) : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जुन्नर शहर व परिसरात प्रतिबंधित क्षेत्र व बफर झोनच्या कालावधीत मंगळवारपासून (ता. 21) पासून वाढ करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी दिली.
जुन्नर शहर दहा दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले होते. ही मुदत आज संपली. त्यानंतर नगर पालिकेच्या मागणीनुसार प्रभारी उपविभागीय अधिकारी रमा जोशी यांनी पुढील आदेश होईपर्यत कंटेनमेंट झोन व बफर झोन कायम राहील, असे कळविले असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील अत्यावश्यक सेवा किराणा माल, औषधे, दवाखाने, बँका, पतसंस्था, भाजीपाला, बी- बियाणे व खत विक्री दुकाने दहा ते पाच या वेळेत सुरू राहतील, असे आदेशात नमूद केले आहे.
जुन्नर शहरात आजअखेर कोरोनाबाधित ३७ रुग्ण आढळून आले. त्यापैकी चार बरे झाले असून, ३१ जण उपचार घेत आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण आढळून आलेला भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आला आहे. परिसरातील बारव, खानगाव, कुसूर, निरगुडे, येणेरे, माणिकडोह, सावरगाव, शिरोली बुद्रुक येथे देखील रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जुन्नर शहर केंद्रस्थानी मानून पाच किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
या परिसरातील नागरिकांचे घरोघरी भेटी देऊन दररोज सर्वेक्षण करण्यात येत आहे संशयित रुग्णांची यादी तयार करण्यात येत आहे. त्यांना घरात विलगिकरण केले जाणार आहे. तसेच, सौम्य व तीव्र स्वरूपाची लक्षणे असणाऱ्यांची वर्गवारी करण्यात येणार आहे. याबाबत पोलिस, महसूल, आरोग्य व नगरपालिका प्रशासनास आदेश देण्यात आले आहेत. याकाळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून गावात येणारे रस्ते बंद राहणार आहेत.
१२३ रुग्णांची कोरोनवर मात
जुन्नर तालुक्यातील कोरोनाबाधित २८३ रुग्णांपैकी १२३ जणांनी कोरोनवर मात केली असल्याची माहिती तहसीलदार हणमंत कोळेकर व नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी दिली. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या २८३ झाली आहे. यापैकी १५३ रुग्ण उपचार घेत आहेत, तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
जुन्नर, उदापूर, आर्वी, येडगाव, कोळवाडी धालेवाडीतर्फे हवेली, ओतूर, शिरोलीतर्फे आळे, नारायणगाव येथे शनिवारी नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जुन्नर शहरात आज ता.२० एक नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने शहरातील एकूण संख्या ३७ झाली आहे. त्यापैकी ३१ जण उपचार घेत असून, ४ जण बरे झाले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील लक्षणे नसणारे परंतु पॉझिटिव्ह रिपोर्ट असणारे ११३ रुग्ण लेण्याद्री कोविड केंद्र येथे, तर ११ जण घरी उपचार घेत आहेत. लक्षणे असणारे २९ रुग्ण पुणे व मंचर येथील शासकीय तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तालुक्यातील विविध ७१ भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. आजअखेर १,१९३ जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. बाहेरून आलेल्या १५०७ जणांपैकी ३२ संस्थात्मक, तर १४७५ होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.