पुणे

बारामतीत कोरोना रूग्णांची संख्या वाढली; प्रशासनाने केल्या सूचना

मिलिंद संगई

बारामती : शहरात कोरोना रुग्णांची  संख्या दरदिवशी वाढू लागल्याने आता प्रशासनापुढील चिंताही वाढू लागली आहे. आज बारामतीतील कोरोना रुग्णांचा आकडा 107 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. गेले दोन दिवस शंभरहून अधिक रुग्ण पॉझिटीव्ह येत असून त्यात शहरातील रुग्णांची संख्या अधिक असल्याने आता नगरपालिकेने उपाययोजना आखण्यास प्रारंभ केला आहे. 

कालच मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी गुरुवारचा आठवडे बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते, आज त्यांनी शहरातील हॉटेल्स, ढाबे येथे क्षमतेच्या 50 टक्केच ग्राहकांना सेवा देण्याचे आदेश जारी केले. प्रत्येक हॉटेल्समध्ये मास्कशिवाय प्रवेश नाही, सॅनेटायझरचा वापर अनिवार्य, येणा-या प्रत्येक ग्राहकाचे नाव, पत्ता मोबाईल क्रमांक लिहून घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या शिवाय ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनिंग गनचाही वापर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. लक्षणे आढळणा-या रुग्णाला प्रवेश नाकारण्यासह हॉटेलचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे असेही यात नमूद केले आहे. 

बारामती नगरपालिकेने आता अधिक वेगाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरु केले आहे. मुख्याधिकारी किरणराज यादव स्वताः या प्रक्रीयेवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान सोमवारी (ता. 22) उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी त्यांच्या दालनात एक महत्वाची बैठक आयोजित केली असून त्यात काही कठोर निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बारामतीतील रुग्णसंख्येचा आकडा वाढू लागल्याने आता प्रशासनाकडून काही निर्बध घातले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लॉकडाऊनचा निर्णय होण्याची शक्यता नसली तरी वेळेवर काही निर्बंध आणले जातील, अशी शक्यता आहे. 

बारामतीची आजची स्थिती...
•    तपासलेले आरटीपीसीआर नमुने  415.
•    एकूण पॉझिटिव्ह-107 
•    शहर-63. ग्रामीण- 44
•    एकूण रूग्णसंख्या-8153
•    एकूण बरे झालेले रुग्ण- 7134
•    एकूण मृत्यू-- 151.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT