corona.jpg 
पुणे

आंबेगावातील महाळुंगे येथे कोरोना रुग्णांची संख्या झाली...

विवेक शिंदे

महाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे कोरोना रुग्णांची संख्या १६ वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णांच्या रुग्ण संख्येत महाळुंगे पडवळ गाव दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. ग्रामस्थांकडून कंटेनमेटझोनच्या नियमांचे पालन केले जात नसून वैयक्तीक खबरदारी घेण्याचे टाळले जात आहे. तसेच आरोग्य विभागाला संपर्काबद्दल माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासन हतबल झाले आहे.

महाळुंगे पडवळ येथे जुलै महिन्याच्या सुरुवातील सैदमळा येथे प्रथम ४० वर्षी तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तो मंचर येथील एका एटीएम मधून पैसे काढल्यानंतर घरी आल्यानंतर त्याला थकवा व अंग दु:खीचा त्रास जाणवू लागला होता. त्याच्या कुटूंबांतील ३ जणांना व संपर्कातील चार जणांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर चासकरमळा येथील नागरिक एका दशक्रिया विधीसाठी गेल्या होता. त्याला व कुटूंबांतील तीन जणांना कोरोनाची लागण झाली. सोलाटमळा येथे एकूण पाच जणांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यामुळे रुग्ण संख्येच्या बाबतीत तालुक्यात गाव दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा वर्कर, पोलिस पाटील, मंचर पोलिस ठाणे आदी कार्यालयामार्फत गावात विविध उपाय योजना केल्या जात आहेत. परंतू रुग्ण संख्येत होणारी वाढ ही प्रशासनाची डोके दुखी ठरत आहे.

सैदवाडी येथील कोरोनाची लागण झालेल्या ४० वर्षीय तरुण व त्यांच्या कुटूंबियांनी कोरोनावर मात केली आहे. नुकतेच त्यांचे स्वागत महाळुंगे पडवळ प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात करण्यात आले आहे. या प्रसंगी सरपंच अनिल सैद, डॉ.अश्विनी गिते, आरोग्य पर्यवेक्षक डॉ.भास्कर साबळे, आरोग्य सेवक संदिप मुंढे, क्षितीजा शिंदे, पोलिस पाटील सविता पडवळ, ग्रामसेवक शशांक चौदंते, खंडू आवटे, गणेश मोरे, गणेश मोरे, प्रदिप पडवळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

‘‘सैदमळा, चासकरमळा व सोलाटवस्ती येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असताना ग्रामस्थांकडून कंटेनमेटझोनच्या नियमांचे पालन केले जात नाही. वेळोवेळी हात धुवून मास्क व सॅनिटायझरचा वापरही पुरेशा प्रमाणात केला जात नाही. वैयक्तीक खबरदारी घेण्याचे टाळले जात आहे. तसेच आरोग्य विभागाला संपर्काबद्दल माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे,’’ असे महाळुंगे पडवळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक डॉ.भास्कर साबळे यांनी सांगितले.  

Edited by : sagar shelar     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

America-Iran War: होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव! २४ तासांत तीन तेल जहाजांवर हल्ले

SCROLL FOR NEXT