Corona_Positive 
पुणे

Corona Updates: पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या पोचली सव्वातीन लाखांजवळ!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या शनिवारी (ता.३१) सव्वातीन लाखांजवळ पोचली. आज अखेरच्या रुग्णांची संख्या आज ३ लाख २३ हजार ५७७ झाली आहे. जिल्ह्यात शनिवारी ७५७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत ६ हजार ७३३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

दरम्यान, दिवसभरात ९२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे एकूण कोरोनामुक्तांची संख्या आता ३ लाख ३ हजार ७३५ झाली आहे. याशिवाय आतापर्यंत ७ हजार ८८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आज दिवसभरातील २३ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील ३७३ जण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये १४६, जिल्हा परिषद क्षेत्रात १९३, नगरपालिका क्षेत्रात ४० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ५ नवे रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १६ जण आहेत. जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६ आणि नगरपालिका क्षेत्रातील १ जणाचा मृत्यू झाला आहे. 

शनिवारी पिंपरी चिंचवड पालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची
संख्या ही शुक्रवारी (ता.३०) रात्री ९ वाजल्यापासून शनिवारी (ता.३१) रात्री नऊ
वाजेपर्यंतची आहे.आतापर्यंत मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ३६९ आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'५५५ बीडी'च्या मालकाची मुलानेच केली हत्या, गोळी झाडून घेत स्वत:लाही संपवलं; काय घडलं?

Bengaluru Doctor Case : मी तुझ्यासाठी तिला मारलं, पत्नीच्या हत्येनंतर लग्नाचे प्रस्ताव नाकारलेल्या महिलांना केले मेसेज

Latest Marathi News Live Update : पुणे रेल्वे स्थानकासमोरील अतिक्रमणांवर कारवाई, वाहतूक कोंडी कमी होणार

Dry Eye Risk in Youth: डिजिटल युगात डोळ्यांवर येणाऱ्या ताणामुळे तरुणाईंला 'Dry Eye'चा धोका! शरीरात हे बदल दिसताच करा पुढील उपाय

Zubair Hungregkar Case: जुबेर हंगरेगकरचे ‘अल कायदा’शी संबंध प्रकरण! ‘वाहदते मुस्लिम ए हिंद’च्या पदाधिकाऱ्यास एटीएसची नोटीस, चौकशी होणार..

SCROLL FOR NEXT