पुणे

तळेगाव ढमढेरे येथील कोरोना रूग्णसंख्येत परत होतेय वाढ

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे डिसेंबर महिन्यात ४९ ग्रामस्थांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी ३० उपचार घेत आहेत तर १९ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी सांगितली. 

तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत १६ गावात आत्तापर्यंत १९४६  इतक्या नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी १८९९ रुग्ण बरे झाले आहेत तर ४७ रुग्णांचा मृत्य झाला असल्याचे डॉ. घोरपडे यांनी सांगितले. 

दरम्यान, तळेगाव ढमढेरे गावात आत्तापर्यंत एकूण ३३७ कोरोना बाधित झाले असून, त्यापैकी ३२५ बरे झाले आहेत तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत १६ गावात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभाग, महसूल विभाग, ग्रामपंचायत प्रशासन, शिक्षण विभाग व पोलीस यंत्रणा आदींनी विशेष खबरदारी घेतली आहे. ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाला यश आले होते. परंतु सर्वच क्षेत्र खुली झाल्याने पुन्हा कोरोनाचा ससर्ग वाढला असून, त्याचा परिणाम म्हणून डिसेंबर महिन्यात कोरोना रुग्ण वाढले आहेत. "कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरावा, गर्दी टाळावी, सामाजिक अंतर ठेवावे, सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन डॉ. घोरपडे यांनी केले आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT