corona.jpg 
पुणे

वाघोलीकरांना मिळतोय दिलासा; आज 24 रुग्णांना सोडले घरी

सकाळवृत्तसेवा

वाघोली : वाघोलीत आज 24 रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर केवळ दोन रुग्णांची वाढ झाली. एकूण  रुग्णांचा आकडा 354 झाला आहे. तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 87 आहे.

वाघोलीचा आकडा साडेतीनशे पार झाला असला तरी बरे होणाऱ्यांची टक्केवारी 75 टक्के आहे. केवळ दोन जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांचा आकडा कधी 10 च्या पटीत तर कधी तीन चार ने वाढतो.  मात्र त्याच पटीत रुग्णांना घरी सोडण्यात येते. 15 एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर 115 दिवसात 353 रुग्णांची भर पडली. म्हणजे सरासरी तीन रुग्णांची दररोज भर पडली.

वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सात गावांचा समावेश आहे. या सात गावात आज 11 रुग्णांची भर पडली तर 35 रुग्णांना घरी सोडण्यात आले. सात गावातील रुग्ण संख्या 578 झाली असून 428 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 74 टक्के आहे. 6 रुग्णांचा मृत्यू झाला असून 144 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

वाघोली वगळता अन्य गावे लोक संख्येच्या मानाने लहान असूनही सहा गावात मिळून 224 रुग्ण आढळून आले आहेत. वाघोलीत आता सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले आहे. नागरिकही मास्कचा वापर करताना दिसतात. अधिक काळजी घेतल्यास रुग्ण संख्या अधिक कमी होईल. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ready Reckoner Rates Unchanged : घर, जमीन घेणे महाग होणार नाही; रेडीरेकनर दर ‘जैसे थे’च, राज्य सरकारचा निर्णय

Parbhani News: शेणखताची ट्रॉली झाली साडेतीन हजाराला!; पशुधन घटल्याने दरात वाढ; खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ

Pune News: पालखी सोहळ्याचा पुणे मुक्कामाचा निर्णय समन्वयातून घेणार: ॲड. राजेंद्र उमाप, १३ एप्रिलला अंतिम निर्णय आळंदीत घेतला जाईल!

मराठी इंडी म्युझिकला नवा मानाचा मुजरा! २ एप्रिलला रंगणार 'मिमा २०२६’चा सोहळा

Latest Marathi News Live Update : १५ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला विदर्भात तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT