पुणे

Coronavirus : पुण्यातही कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ

वृत्तसंस्था

पुणे : भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. आता मुंबई, पुणे व पिंपरी-चिंचवड येथील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 52 झाली आहे.

दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्र त्यानंतर आता पंजाबमध्येही प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये काही रुग्ण भारताबाहेरील असल्याचे समोर आले आहे. तसेच जे रुग्ण दाखल झाले होते, त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. या सर्व रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, आता त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार आहे. 

अतिदक्षतेचा रुग्ण असल्यास सरकार खर्च करणार

जर अतिदक्षतेचा रुग्ण असेल तर महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेंतर्गत त्याचा संपूर्ण वैद्यकीय खर्च सरकार करणार आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

भारतात आत्तापर्यंत 195 प्रकरणं समोर आली असून, यामध्ये 163 भारतीय नागरिक आहेत. तसेच देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. याची संख्या 52 झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mutual Fund New Rule: म्युच्युअल फंडचे नियम लवकरच बदलणार; गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या नियम

Australia T20 Squad: भारताविरुद्ध खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात मॅक्सवेलचं पुनरागमन; २० वर्षीय खेळाडूलाही दिली संधी

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळची कार जप्त; पुणे पोलिसांची जामखेडमध्ये कारवाई

Mangal Gochar 2025: मंगळ गोचर वृश्चिक राशीत करणार भ्रमण, मिथूनसह 'या' 5 राशींना मिळेल आर्थिक लाभ

Travel Tips: मुलांसह विमान प्रवास करताना पालकांनी टाळाव्यात 'या' बेसिक चुका, जाणून घ्या स्मार्ट पॅरेंट्ससाठी टिप्स

SCROLL FOR NEXT