पुणे

पुणे : पूर्व हवेलीत कोरोनाचे थैमान; उपचारासाठी धावण्याची वेळ

जनार्दन दांडगे

उरुळी कांचन : पूर्व हवेलीत मागील 15 दिवसांपासून कोरोनाने थैमान घातले. विविध ग्रामपंचायत हद्दीतील कोरोना ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या दीडशेवर पोचली आहे. मात्र, या रुग्णांसाठी स्थानिक परिसरात पुरेसे बेड व कोरोना पूर्व चाचणीसाठी लागणारे व्हीटीएम किट पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने, कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या संपर्कातील नातेवाईकांवर स्वॅब तपासणीसाठी व उपचारासाठी सैरावैरा धावावे लागत आहे.

खासदार, आमदार यांच्यासह महसूल विभाग, पंचायत समिती व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागील पंधरा दिवसांच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बैठका घेऊन "हवी ती मदत व हवी ती सामुग्री देऊ" अशा आशयाचे आश्वासन किमान दहावेळा दिले असले तरी, ही आश्वासने केवळ हवेतील पोकळ गप्पा ठरल्या आहेत. यामुळे पूर्व हवेलीमधील नागरिकांना कोणी वाली आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे. नागरिक कोरोनासारख्या मोठ्या संकटात असताना, लोकप्रतिनीधी व शासकीय अधिकारी नेमके कधी जागे होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लोणी काळभोर, उरुळी कांचन, मांजरी बुद्रुकसह पूर्व हवेलीत मागील पंधरा दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरु असले तरी, केंद्रात पुरेसा स्टाफ व कोरोनाच्या तपासणीसाठी लागणारे व्हीटीएम किट पुरेसे उपलब्ध होत नसल्याने, रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना कोरोना तपासणीसाठी आजही धावाधाव करावी लागतच आहे. तर दुसरीकडे दीडशेहून अधिक रुग्ण असताना, शासकीय पातळीवर विश्वराजमध्ये 20 बेड्स उपलब्ध करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध नसतील तर खाजगी रुग्णालयातील ८० टक्के बेड ताब्यात घ्या, असा आदेश दिलेला असतानाही, आरोग्य विभागाच्या सुस्त कारभारामुळे नागरिकांना बेडसाठी धावाधाव करावी लागत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार यांनी हवेलीचे उपसभापती सनी काळभोर यांच्यासह आरोग्य, महसूलसह विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या 10 हून अधिक आढावा बैठका पार पडलेल्या आहेत. प्रत्येक बैठकीत घेऊन, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी "हवी ती मदत व हवी ती सामुग्री द्या" अशा सूचना प्रशासनाला केलेल्या आहेत. मात्र, एकाही सूचनेवर अंमलबजावणी अद्यापतरी झालेली नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

याबाबत नाव न छापण्याच्या अटीवर अधिक माहिती देताना आरोग्य विभागातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, लोणी काळभोर येथील कोरोना केअर सेंटरमध्ये स्वॅब तपासणीसाठी लागणारे किट पुरेसे मिळत नसल्याने, रुग्णांना पुण्यात पाठवावे लागते ही बाब खरी आहे. संबधित किट वाढवून मिळावेत, यासाठी जिल्हा परिषदेकडे किमान सहावेळा तरी लेखी स्वरुपात पाठपुरावा केलेला आहे. मात्र, आरोग्य विभाग या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. विश्वराजमधील 20 बेड्स राखीव ठेवल्या असल्या तरी, रुग्णांची संख्या पाहता सध्या दोनशेहून अधिक बेडची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गरज भासल्यास, खाजगी रुग्णालयातील 80 टक्के बेड ताब्यात घ्या, असे आदेश दिले आहेत. पूर्व हवेलीत दहाहून अधिक मोठी खाजगी रुग्णालये असतानाही, केवळ महसूल व आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे बेड उपलब्ध होत नाहीत ही वस्तूस्थिती आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, याबाबत बोलताना जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार म्हणाले, पूर्व हवेलीमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, बेडची संख्या अतिशय मर्यादित आहे, ही बाब खरी आहे. मात्र, पूर्व हवेलीमधील खाजगी रुग्णालयातील बेड ताब्यात घेऊन, कोरोनाच्या रुग्णासाठी बेड वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तर लोणी काळभोर येथील कोरोना केअर सेंटरला वाढीव किट व स्टाफ देण्याच्या सूचना यापूर्वीच करण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

PM Narendra Modi: पत्रकार परिषद का घेत नाही? पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सांगितलं

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

SRH vs GT Live Score : हैदराबादमध्ये पुन्हा पावसाचं थैमान; नाणेफेकच काय सामन्यावरही दाटले ढग

SCROLL FOR NEXT