sharad pawar esakal
पुणे

बारामती पंचायत समिती निवडणूकीत इच्छुकांची संख्या वाढणार

राज्यातील पंचायत समितीच्या इमारतींपैकी सर्वात भव्य व प्रशस्त इमारत असल्याचा दाखला खुद्द ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीच आपल्या भाषणात दिला.

मिलिंद संगई,

राज्यातील पंचायत समितीच्या इमारतींपैकी सर्वात भव्य व प्रशस्त इमारत असल्याचा दाखला खुद्द ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीच आपल्या भाषणात दिला.

बारामती - सुमारे 21 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या बारामती तालुका पंचायत समितीच्या (Baramati Panchyat Committee) नूतन वास्तूचे उदघाटन ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते झाले खरे पण वास्तू पाहिल्यानंतर आगामी पंचायत समितीच्या निवडणूकीत (Election) इच्छुकांची भाऊ गर्दी वाढणार असेच सूतोवाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच बोलून दाखविले.

राज्यातील पंचायत समितीच्या इमारतींपैकी सर्वात भव्य व प्रशस्त इमारत असल्याचा दाखला खुद्द ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीच आपल्या भाषणात दिला. तोच धागा पकडून शरद पवार यांनीही इतकी सुंदर इमारत झाल्यानंतर साहजिकच या इमारतीत बसून कामकाज करण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढणार आणि त्यातून इच्छुकांची निवड करणे नेतृत्वाला कठीण जाणार असे गंमतीने नमूद केले.

बारामती तालुका पंचायत समितीच्या उदघाटनाच्या दोन दिवस अगोदरपासूनच बारामतीतील असंख्य जणांनी आपल्या व्हॉटसअँपच्या स्टेटसला या इमारतीचे फोटो लावले होते. तालुक्यातून अनेक जण ही भव्य इमारत पाहण्यासाठी आवर्जून आलेले होते. या इमारतीची भव्यता, सभापती, उपसभापती व सदस्यांसाठीची सुविधा, प्रशस्त पार्किंग, मध्यवर्ती ठिकाणी असलेली इमारत पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले.

तालुका पंचायत समितीचे सदस्यपद तालुक्याच्या राजकारणात महत्वाचे समजले जात असल्यानेही यंदाच्या निवडणूकीला इच्छुकांची गर्दी वाढणार हे उघड असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT