The number of passengers departure was more than the number of passengers arriving in Pune 
पुणे

काय सांगता! विमानाने पुण्यात येणाऱयांपेक्षा जाणाऱयांची संख्या वाढली, 'अशी' आहेत कारणे 

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरातील कोरोनाच्या धास्तीमुळे पुण्यातून बाहेर पडणाऱया नागरिकांचे प्रमाण वाढत असल्याचे विमान वाहतुकीतूनही अधोरेखित झाले आहे. विमान प्रवासाद्वारे एक महिन्यांत 41 हजार 530 नागरिक पुण्यात आले असून तब्बल 71 हजार 496 प्रवासी पुण्यातून बाहेर पडले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे केंद्र सरकारने विमान वाहतूक 25 मार्चपासून बंद केली होती. त्यानंतर लॉकडाउनमध्ये शिथिलता आली. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) दिलेल्या आदेशानुसार 25 मे पासून दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, कोलकत्ता, हैदराबाद, प्रयागराज, उदयपूर आदी शहरांसाठी विमान वाहतूक पुण्यातून सुरू झाली आहे. मात्र, वंदे भारत मिशनतंर्गत वगळता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा सध्या बंदच आहे. 

डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश, कोरोना चाचण्यांची संख्या वाढणार
पुण्यातील लोहगाव विमानतळावरून 25 मे ते 24 जून या एक महिन्यात 1236 विमानांच्या फेऱया झाल्या. 618 विमाने पुण्यात आली. त्यातून 41 हजार 530 प्रवासी पुण्यात आले तर, रवाना झालेल्या 618 विमानांतून 71 हजार 496 प्रवासी पुण्याबाहेर गेले, अशी माहिती लोहगाव विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग यांनी दिली. 

मध्यरात्री कोंढव्यात आग लागल्याची खबर अग्निशामक दलाला मिळाली अन्..
कुलदीपसिंग म्हणाले, "एक महिन्यांत पुण्यातून एकूण 1 लाख 13 हजार प्रवाशांची वाहतूक झाली. पुण्यात शिक्षण, व्यवसाय, नोकरी आदी विविध कारणांसाठी येणाऱया नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाच्या काळात पुण्यातून बाहेर पडणाऱयांची संख्या जास्त असल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. विमानतळावर सर्व प्रकारची काळजी घेऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी करून प्रवाशांची वाहतूक झाली आहे." 

केंद्रीय सीमाशुल्क विभाग (कस्टम्स), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) यांच्यामदतीने प्रवाशांची वाहतूक सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. विमानतळावर येणाऱया प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पुरेशी वैद्यकीय  पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

माणुसकी आता नाही तर, कधी दाखवायची? रोहित पवार यांचे घरमालकांना पत्र

9 हजार प्रवाशांनी वापरली रिक्षा 
विमान वाहतूक सुरू झाल्यावर शहरात वाहतुकीवर निर्बंध होते. त्या काळात ऑटो ग्लाईड या संघटनेतर्फे विमानतळ आणि पोलिस प्रशासनाने प्रवाशांना रिक्षा उपलब्ध करून दिली होती. रिक्षा प्रवासासाठी विमान प्रवासाचा बोर्डिंग पास ग्राह्य धरणात आला होता. या रिक्षांतून एक महिन्यांत सुमारे 9 हजार प्रवाशांनी प्रवास केला, अशी माहिती ऑटो ग्लाईडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शितोळे यांनी दिली. 

खूशखबर ! साडेचारशेहून अधिक क्षेत्रात उपलब्ध होणार रोजगाराच्या संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market मध्ये नुकसान झालं नाशिकच्या दोन पठ्ठ्यांनी असा मार्ग निवडला की पोलिसांनीही डोक्याला हात मारला; नेमकं काय घडलं?

Gold Rate Today : सोन्याच्या भावात अचानक वाढ, चांदीही चमकली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Asia Cup 2025 Super Four Scenario: बांगलादेशच्या विजयाने सुपर ४ ची स्पर्धा रोमांचक वळणावर; ३ जागांसाठी ५ संघांमध्ये चुरस... पाकिस्तानचा फैसला आजच

Share Market : भारतीय शेअर बाजाराची तेजीने सुरुवात; सेन्सेक्सने ओलांडला ८२६०० चा टप्पा, निफ्टीतही ७८ अंकांची वाढ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा पगार ऐकून थक्क व्हाल; पगाराशिवाय आणखी काय मिळतं त्यांना? जाणून घ्या सुविधा आणि एकूण संपत्ती

SCROLL FOR NEXT