corona update.jpg 
पुणे

व्यावसायिकांनो सुधारा रे; किरकटवाडी, नांदेड परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात नियम धाब्यावर

निलेश बोरुडे

किरकटवाडी (पुणे) : हवेली तालुक्याच्या पश्चिम भागातील किरकटवाडी, खडकवासला, नांदेड या तीन गावांतील कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असून सध्या या रुग्ण संख्येचा आकडा 91 वर जाऊन पोहोचला आहे. जिल्हा प्रशासनाने आदेश काढून किरकटवाडी, खडकवासला, नांदेड या तीनही ग्रामपंचायतीचे पूर्ण क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित केलेले आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवेची दुकाने केवळ सकाळी 10 ते दुपारी 2 याच वेळेत सुरू राहतील असे आदेश काढले आहेत. मात्र अनेक व्यावसायिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटखा, तंबाखू, सिगारेट यांची खुलेआम विक्री करत आहेत.

नांदेडची आतापर्यंतची एकूण रुग्ण संख्या 38 असून त्यापैकी 3 रुग्ण बरे झाले आहेत 33 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 2 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. किरकटवाडीची एकूण रुग्ण संख्या 16 असून यापैकी 7 रुग्ण बरे झाले आहेत तर 9 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खडकवासला येथील रुग्ण संख्येचा आकडा मागील चार दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला असून एकूण रुग्ण संख्या 37 झाली आहे. यापैकी 3 रुग्ण बरे झाले असून 34 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या तीन गावांतील एकूण 13 रुग्ण बरे झाले असून 76 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर दोघांचा मृत्यू झालेला आहे. अशी माहिती खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉक्टर वंदना गवळी यांच्याकडून देण्यात आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या गावांमध्ये रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संपूर्ण गावाचे क्षेत्र प्रतिबंधित करण्याचे आदेश दिले. रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले. परंतु स्थानिक पातळीवर योग्य अंमलबजावणी होत नसल्याने अत्यावश्यक सेवे शिवाय इतरही दुकाने (हार्डवेअर, स्टेशनरी, केक शॉप,इ.) सुरू राहत असल्याचे दिसत आहे. अनेक किराणा दुकानांमधून तंबाखू, गुटखा, सिगारेट अशा प्रतिबंधित वस्तूंची खुलेआम विक्री होत आहे‌. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्राचा आदेश कागदावरच राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रतिबंधित क्षेत्राचे आदेश काटेकोरपणे पाळले जातात की नाही, स्थानिक प्रशासन योग्य कार्यवाही करते कि नाही, वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासनामध्ये समन्वय आहे की नाही, अशा गोष्टींची पाहणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने गावी प्रतिबंधित करून त्याचा मूळ हेतू साध्य होतो की नाही हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पोटच्या मुलीचा गळा दाबून मुलासह आईने विहिरीत मारली उडी, मुलाचा दुर्दैवी अंत

वयाच्या ५७ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढला हा अभिनेता; पत्नीच्या इच्छेसाठी घातला सगळा घाट; लग्नाचे फोटो व्हायरल

काय? १६७.२ कोटींना विकलं गेलं ‘यशोदा-श्रीकृष्ण’ चित्र, यात नक्की विशेष काय? Viral

Sonu Nigam Concert : पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच; सोनू निगम लाईव्ह कॉन्सर्ट, १० मे

Iranian Oil Tanker: होर्मुझ ओलांडल्यानंतर समुद्रात मोठा खेळ; भारताकडे निघालेल्या इराणी जहाजाचा यू-टर्न, चीनला जात आहे तेल

SCROLL FOR NEXT