daund.jpg 
पुणे

नगर रस्ता परिसराची चिंता वाढली, कारण...

सकाळवृत्तसेवा

वडगाव शेरी : मागील महिनाभरात नगर रस्ता भागातील कोरोना रुग्ण तिपटीहून अधिक वाढले आहेत.  4 जुलैला रूग्णसंख्या 646 होती. ती आता 2101 झाली आहे. या भागात खऱाडीतील रुग्णवाढीचा वेग मोठा असून येथील एकुण रुग्णांच्या तब्बल ऐंशी टक्के रूग्णांवर अद्याप उपचार सूरू आहेत. रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यात आणि रूग्ण आढळलेल्या भागात प्रभावी उपाय योजना करण्यात महापालिका प्रशासन कमी पडत असून येथील रूग्णसंख्या वाढीची टक्केवारी त्यामुळे चिंतेत भर टाकणारी ठरत आहे.

 खरा़डीतील रुग्णवाढीचा वेग धडकी भरवणारा- नगर रस्ता क्षेत्रिय कार्यालय हद्दीत खराडी, वडगाव शेरी आणि विमाननगर हे चार प्रभाग व प्रभाग क्रमांक बेचाळीसमधील लोहगावचा भाग येतो. यात सर्वाधिक रूग्णांची वाढ खराडीत पाहायला मिळत आहे.  त्यापाठोपाठ वडगाव शेरी व विमाननगरचा क्रमांक लागत आहे. खराडीची रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असून ती 31 जुलैपर्यंत आठशे आठ इतकी नोंदवली गेली. त्यात 637 रूग्णांवर उपचार सूरू आहेत. म्हणजे एकुण रूग्णांच्या तब्बल ऐंशी टक्के रूग्णांवर अद्याप उपचार सूरू असून 160 रूग्ण बरे झाले आहेत. खराडीत अकरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

खऱाडीतील महत्वाच्या भागातील रूग्णसंख्या कंसात दिली आहे. कल्पतरू सोसायटी (41), चव्हाण पार्क - नगर (11) , वीडी कामगार (58) , थिटे वस्ती (42), तुकाराम नगर (38), बोराटे वस्ती (27), सातव वस्ती (10), संभाजी नगर (10), गणेशनगर (29), रक्षकनगर (9), यशवंत नगर (9), फॉरेस्ट कौंटी (13), पठारे वस्ती (12), काळुबाई नगर (10), यासोबत सदगरू, गोविंद पार्क व दत्तप्रसाद सोसायटी आदी 161 ठिकाणी रुग्ण आढळून आले आहेत.

खराडीतील रूग्णवाढीचे नेमकी कारणे काय आहेत ? 

वीडी कामगार चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत दोन्ही बाजुंनी भाजी बाजार सुरू झाला असून विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येथे दिवसभर होणाऱ्या गर्दीवर पालिका प्रशासनाचे नियंत्रण नाही. त्यामुळे नेमके याच रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या परिसरात रुग्णसंख्या वाढली आहे. खराडीतील कोवीड केअर सेंटर हे नगर रस्त्यावरील एकमेव सेंटर असल्याने येथे चाचणीसाठी गर्दी होते. पॉझिटीव्ह व निगेटिव्ह लोक एकत्र रांगेत थांबतात. तसेच विलगीकरण कक्षात रिपोर्ट येईपर्यंत सगळ्यांना एकत्र ठेवले जाते. चाचणीचा अहवाल कधी कधी तीन दिवस येत नाही. तोपर्यंत रुग्ण इतरांच्या संपर्कात येतो. रूग्ण आढलेल्या भागात जाऊन संपर्कातील लोक शोधणे, तो भाग तातडीने सील करणे, पोलिसांची मदत घेणे, त्या भागाचे निर्जंतुकीकरण करणे ही कामे कमी मणुष्यबळामुळे वेगात होत ऩाहीत.

वडगाव शेरीचे माजी आमदार बापु पठारे रूग्णवाढीची वरील कारणे सांगताना म्हणतात, शासनाने कोरोना प्रतिबंधासाठी पुण्यात एका वार्ड ऑफिसला एक या प्रमाणे शहरात सध्या कार्यरत असलेल्या आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवल्यास संपुर्ण शहरातील कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणायला, नियोजन करायला मोठी मदत होईल. वरीष्ठ अधिकारी खाली लक्ष देत नसल्याने नगर रस्ता परिसरात रूग्णसंख्या महिन्यात तिप्पट झाली आहे. 

खराडीतील नगरसेवक महेंद्र पठारे म्हणाले, धारावीतील जनतेने शिस्त पाळून जर कोरोना रोखला तर खराडीकरांनाही ते शक्य आहे. यासाठी स्वयंशिस्त महत्वाची आहे. सोशलडिस्टंसिंगचे पालन करून नागरिकांनी गर्दी टाळावी व प्रशासनाला सहकार्य करावे. 

नगर रस्ता क्षेत्रिय कार्यालयांतर्गत चार प्रभागाची मिळून रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे.  कंसात आकडेवारी दिली आहे.

 एकुण रुग्ण (2101), उपचार घेणारे ( 1322), मयत (28), डिस्चार्ज ( 751). विमाननगर प्रभागात रूग्णसंख्या (478), उपचार सुरू (250).  वडगाव शेरी प्रभागाची रूग्णसंख्या (532) असून 273 रग्ण उपचार घेत आहेत. लोहगाव प्रभाग क्रमांक बेचाळीस मध्ये रूग्णसंख्या 283 वर पोहोचली असून 156 रुग्ण उपचार घेत आहेत. 

नगर रस्ता भागातील रूग्णसंख्या वाढ थोपवण्यासाठी पालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त रूबल आगरवाल यांनी विशेष लक्ष द्यावे. या भागातील नियोजनाचा नव्याने आढावा घ्यावा, अशी मागणी वडगाव शेरी नागरीक मंचाचे आशिष माने , न्यु नगर रोड सिटीझन फोरमच्या आरती सोनग्रा, प्रदेश विद्यार्थी कॉंग्रेसचे सरचिटणीस संकेत गलांडे, शिवसेनेचे नितीन भुजबळ आदींनी केली आहे.             
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT