Crime-Suicide 
पुणे

लॉकडाऊन शिथील होताच आत्महत्यांच्या घटना वाढल्या; काय आहेत याची कारणे?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या अडीच महिन्याच्या कालावधीत वेगवेगळ्या कारणामुळे होणाऱ्या आत्महत्येचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत 38 टक्के इतके कमी झाल्याचे चित्र होते. मात्र लॉकडाऊनमुळे लागू करण्यात आलेली शिथिलता काही प्रमाणात उठविल्यानंतर मे महिन्याच्या मध्यावधीनंतर वाढले असल्याची सद्यस्थिती आहे.

गुरुवारी मध्यरात्री सुखसागर येथील एकाच कुटुंबातील चार जणाचा गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली, तर शुक्रवारी सकाळी धायरी येथे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबाने आर्थिक विवंचनेतून, तर धायरीतील व्यक्तीने नैराश्यतून आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. मात्र, दाम्पत्य आणि त्यांच्या मुलांच्या मृत्यूने अनेकांना धक्का बसला.

मागील वर्षी मार्च महिन्यात 54, एप्रिल महिन्यात 64 तर मे महिन्यात 50 जणानी आत्महत्या केल्या होत्या. तर यावर्षी मार्चमध्ये 45, एप्रिलमध्ये 28 व मे महिन्यात (20 तारखेपर्यंत) 18 जणानी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहरात 22 मार्चनंतर कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे बहुतांश नागरीक आपल्या घरात होते. त्यामुळे सुरुवातीच्या दोन ते अडीच महिन्यात आत्महत्या काही प्रमाणात कमी झाल्या. मात्र ससून रुग्णालयात 15 मे ते 19 जून या 34 दिवसाच्या कालावधीत शहर व परीसरात शवविच्छेदनासाठी आलेल्या मृत व्यक्तिपैकी 68 जणानी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लॉकडाऊनचे नियम जसजसे शिथील होऊ लागले तसतशा आत्महत्येच्या घटना पुन्हा जोर धरु लागल्याची चिन्हे आहेत.

आत्महत्येचा मार्ग पत्करण्याची कारणे
- कमालीचे नैराश्य व एकाकीपणा 
- दुर्धर आजार व वेदनापासुन मुक्तता मिळण्यासाठी
- महिलांबाबत होणारा कौटुंबिक हिंसाचार
- व्यवसायत झालेले आर्थिक नुकसान
- विविध पद्धतीने झालेली आर्थिक फसवणूक
- नोकरी गमाविणे, बेरोजगारी व आर्थिक विवंचना
- नातेसंबंधातील वाद-विवाद, दुरावा आदी

"लॉकडाऊनमध्ये देखील आत्महत्येच्या घटना घडल्या. मागील वर्षीच्या मार्च, एप्रिल महिन्याच्या तुलनेत आत्महत्या 38 टक्के इतक्या कमी झाल्या आहेत. त्याचे कारण लॉकडाऊनमध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र असणे हे आहे. कुटुंबामुळे मानसिक आधार मिळाल्याने नागरीकांनी आत्महत्येचा विचार मनातून काढला असण्याची शक्यता आहे."
- बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त (गुन्हे)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT