खडकवासला - धरण चौपाटी परिसरात रविवारी पर्यटकांची गर्दी कमी प्रमाणात होती.
खडकवासला - धरण चौपाटी परिसरात रविवारी पर्यटकांची गर्दी कमी प्रमाणात होती. 
पुणे

सिंहगडावर पर्यटकांची संख्या रोडावली

सकाळवृत्तसेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून पर्यटन व धार्मिक ठिकाणे बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार, धरणावरील चौपाटी बंद होती. गडावर जाणाऱ्या पर्यटकांना आवाहन केले होते. तरी देखील नेहमीपेक्षा किमान 20 टक्के पर्यटक येथे आले होते.

खडकवासला धरण, सिंहगडावर पर्यटकांची दर शनिवार- रविवारी सुमारे 20 हजार पर्यटकांची गर्दी असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही ठिकाणी पूर्णपणे शुकशुकाट होता. असं म्हणता येईल अशी परिस्थिती तर अजिबात नव्हती. खडकवासला धरणाच्या चौपाटीवर शनिवारी नेहमीप्रमाणे गर्दी होती. रविवारी मात्र हवेली पोलिसांनी खाद्यपदार्थ स्टॉलला बंदी केली होती. परिणामी, येथील 100हुन अधिक असलेले स्टॉल 100 टक्के बंद होते. दुपारी नंतर धरण परिसरात पर्यटकांची संख्या वाढली. पर्यटक येऊन थांबत काही जणांनी तर धरणाच्या पाण्यात उतरून पोहत होते. अनेक जण कुटुंब मित्र मैत्रिणी समवेत येथे याठिकाणी बसले होते.

चौपाटीवर हवेली पोलिसांचा बंदोबस्त होता. पोलिस पुढे गेले की, पर्यटक मागे वाहने थांबवायचे पोलिसांनी सूचना केले की निघून जायचे. असे दिवसभर शोध सुरू होता.

गडाच्या गर्दीत 80 टक्के घट
गडावर दर शनिवार- रविवारी असणाऱ्या गर्दीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 80 ते 90 टक्के गर्दीत घट झाल्याचे दावा वन विभागाने केला आहे. ही घट गुरुवारपासून जाणवली.
गुरुवारी औद्योगिक सुट्टी असते त्या दिवशी आठशे ते हजार दुचाकी आणि 175 चार चाकी जातात. ती संख्या या गुरुवारीअनुक्रमे दीडशे पर्यंत चार चाकी संख्या 25 पर्यंत होती. 

शुक्रवारी साडेचारशे दुचाकी अन सव्वाशेच्या चारचाकी असतात. आज दुचाकी 140 पर्यंत होती चारचाकी 40 आल्या होत्या. दर शनिवारी सुमारे 600 पेक्षा जास्त दुचाकी आणि सव्वा दोनशे चारचाकी जातात. या शनिवारी मात्र अडीशे दुचाकी आणि 86 चारचाकी गडावर गेल्या. रविवारी सतराशेहून अधिक दुचाकी तर तीनशे पर्यंत चारचाकी गडावर जातात. आज 430 दुचाकी 156 चारचाकी गडावर गेल्या होत्या. अशाप्रमाणे घडत जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 90 टक्के घट झाली आहे. वनविभाग उपद्रव शुल्क नाक्यावर जमा केले जाते. त्यात देखील नेहमी पेक्षा फक्त चौथा हिस्सा जमा होत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक पवार यांनी सांगितले.

पर्यटन ठिकाणी गर्दी नको
राष्ट्रीय आपत्ती जाहीर झाल्यामुळे साथ रोगाचा संसर्ग वाढू नये यासाठी हवेलीतील विविध गावच्या यात्रा- जत्रा तसेच सिंहगड, खडकवासला पर्यटन ठिकाणी विविध मंदीरातील धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. तेथे गर्दी करू नये. असे आवाहन प्रांताधिकारी सचिन बारवकर यांनी 'सकाळ'शी बोलताना केले.

चौपाटी परिसरात पर्यटकांनी गर्दी टाळावी. जनजागृती केली जाईल. असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले.

गर्दी वाढल्याने विषाणूचा संसर्ग जास्त वाढू शकतो. म्हणून, खडकवासला, सिंहगड या ठिकाणी नागरिक, पर्यटकांनी येऊ नका. असे आवाहन पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Bomb Threat : सरकारी रुग्णालयांनंतर दिल्लीतील विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

MS Dhoni CSK vs RR : चेपॉकवर धोनीची सामन्यानंतर फटकेबाजी; चाहत्यांनी स्टेडियम घेतलं डोक्यावर

Covid subvariant: चिंता वाढली! राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे 'इतके' रुग्ण आढळले, पुण्यात 51 तर ठाण्यात 20

गोफण | भटकती आत्मा.. ऑफर नव्हे सल्ला! प्रकरण कोर्टात

Team India Racism : भारतीय क्रिकेट संघात होतोय वंशभेद..? वर्ल्डकप विजेत्या संघातील माजी खेळाडूचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT