pune1.jpg 
पुणे

पुणे : मुंबई- बंगळुरू एक्प्रेसवेवर धावतायेत आर्थिक गतीची चक्रे

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या संकटातून देश अनलॉक होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जनजीवन पुन्हा सुरळीत आहे. त्यामुळे अर्थ चक्राचा एक भाग असलेली मालवाहतूक सुरू झाली आहे. सोमवारी मुंबई-बंगळुरू एक्सप्रेस वेवर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. लॉकडाउनमध्ये बऱ्याच अंशी शिथिलता दिल्याने शहरातील वर्दळ देखील वाढली आहे.

लॉकडाउनचा पाचवा टप्पा सुरू झाला त्याच वेळी शहरातील महत्त्वाच्या चौकातील सिग्नल सुरू करण्यात आले होते. त्यात आता आणखी वाढ झाली असून पेठा आणि रुग्ण संख्या जास्त असलेला भाग वगळून इतर ठिकाणी वाहतूक सुरळीत झाल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. शहरातील छोटे व्यवसाय आणि खाजगी कार्यालये सुरू झाल्याने नोकरदार आता पुन्हा कामावर रुजू होत आहेत.

त्यामुळे तब्बल दोन महिने घरी असलेले पुणेकर आपली वाहने घेऊन रस्त्यावर आले आहेत. दुचाकीवरून आपल्या ऑफिसला निघालेले शिरीष म्हस्के म्हणाले की, लॉकडाउन काळात आमचे दुकान पूर्णतः बंद होते. मात्र, आता ते सुरू झाले असून सकाळी दुचाकी साफ करून घेतली आणि आता कामावर निघालो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या मंत्रिमंडळात कोण इन, कोण आउट? संभाव्य यादी समोर; महाराष्ट्रातूनही 'हे' नाव चर्चेत, धर्मेंद्र प्रधानांचं खातं कुणाला?

Latest Marathi News Update : अयोध्या राम मंदिर गैरव्यवहार प्रकरणातील आठ आरोपींच्या घरांवर पोलिसांची धाड

Humanity Story: आयुष्याच्या सायंकाळी कोसळल्या धर्माच्या भिंती! नात्यांनी साथ सोडली, मानवतेने दिला आधार, मुस्लिम महिलेने पार पाडले हिंदू अंत्यविधी..

IND vs IRE, IND W vs AUS W: आज क्रिकेट चाहत्यांची चांगलच गोंधळणार! टीम इंडियाचे एकाच दिवशी 2 सामने; कुठे आणि किती वाजता पाहणार?

Satej Patil on Gokul election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार? सतेज पाटील यांनी एका वाक्यात कंडका पाडला

SCROLL FOR NEXT