Corona  sakal
पुणे

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे ऑफलाइन वर्ग येत्या ३० जानेवारीपर्यंत बंद

पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा मंगळवारी पवार यांनी घेतला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुणे महापालिकेच्या क्षेत्रातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे ऑफलाइन वर्ग येत्या ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (ता.४) पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली. या शाळांमधील सर्व वर्ग आॅनलाइन सुरु राहतील, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.(covid 19)

पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा मंगळवारी पवार यांनी घेतला. या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या कोरोना आढावा बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, वंदना चव्हाण, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.(online class)

पवार म्हणाले, ‘‘राज्यात ओमीक्रॉन व्हेरियंटच्या कोरोनाचा चा संसर्ग वाढू लागला आहे. याला आळा घालण्यासाठी मुंबई व ठाण्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. पुणे शहराने याबाबत अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गाची स्थिती बिकट होत आहे. सध्या जगभरातील १०५ देश, भारतातील २३ राज्ये आणि राज्यातील ११ शहरांमध्ये ओमीक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. पुणे शहरात एकाच दिवसाचा पॉझिटीव्हीटी दर १८ टक्के झाला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ३० जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीचे वर्ग बंद राहतील. मात्र १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना कोरोना लस देण्यास सुरवात केली असल्याने इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग सुरू राहतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT