0OLA.jpg
0OLA.jpg 
पुणे

ओलाच्या बिझिनेस मॉडेलविरुद्ध ओलाच्या पार्टनर्सचे आंदोलन 

सकाळवृत्तसेवा

पुणे : ओलाच्या बिझिनेस मॉडेलच्या निषेधार्थ ओला पार्टनर ड्रायव्हर्सनी शहरात आंदोलन सुरू केले आहे. पार्टनर्सची ओलाकडून फसवणूक होत असल्याचा आरोप करून तेजल आगरवाल (वय 31, रा. चिंचवड) या चालकाने ओलाच्या राजा मोतीलाल बहादूर मिल रस्त्यावर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास केला.

ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ओलाच्या बिझिनेस मॉडेलमध्ये चालकांची फसवणूक होत असल्याचा जबाब त्याने पोलिसांना दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने या आंदोलनात चालकांच्या बाजूने उडी घेतली आहे. संघटनेचे अध्यक्ष गणेश नाईकवडे आणि मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनीही आंदोलनात भाग घेतला आहे. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार नाईकवडे यांनी केला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, शहरातील ओलाची वाहतूक सुरळीत असल्याचे कंपनीच्या अधिकृत प्रवक्‍त्याने स्पष्ट केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

SCROLL FOR NEXT