old couple got help from ngo sassoon hospital pune 
पुणे

सून दोघांना ससूनमध्ये टाकून गेली; पण, दोघांची सेकंड इनिंग आनंदी!

अक्षता पवार

पुणे : आजारपणाने मुलगा गेला. त्यामुळे वृद्ध सासु-सास-यांची जबाबदारी सुनेवर आली. मात्र सासरे आजारपणाने कायमचे अंथरुनातच व सासुला ब्रेस्ट कॅन्सर. उपचाराच्या निमित्ताने ती एक दिवस दोघांना ससून रुग्णालयात घेवून गेली. त्यानंतर केस पेपर काढण्याच्या बहाणा करून दोघांनाही तिथेच सोडून गेली. कोणीच नातेवाईक नसलेल्या या निराधार वृद्ध जोडप्याची जबाबदारी वात्सल्याने स्वीकारून त्यांची सेकंट इनिंग आनंदी केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्याासाठी येथे क्लिक करा

जॉन (वय 80 ) आणि मेरी (वय 78 ) यांच्या मुलाचे गेल्या वर्षी आजाराने निधन झाले होते. त्यामुळे सुन सुजैन (सर्व नावे बदललेली) या दोघांना पाहत होती. मात्र त्यांच्या आजारपणाला वैतागून तिने या दोघांना ससुनमध्ये सोडून दिले. दोघांनावर सुमारे तीन महिने ससूनमध्ये उपाचार सुरू होते. याच काळात त्यांची जबाबदारी एखाद्या संस्थेने स्विकारावी यासाठी समाज सेवा अधिक्षक सत्यवान सुरवसे आणि किरण कांबळे यासाठी प्रयत्न करीत होते. त्याच काळात सामाजिक कार्यातील पदवृत्तर शिक्षण घेत असलेल्या तेहसिन शेख हिने याबाबत वात्सल्याधाम संस्थेशी संपर्क साधला. अत्यंत बिकट अवस्था असलेल्या या दाम्पत्याला रुग्णालयने मोठा आधार दिला. मात्र, त्यांचे नातेवाईक सोडून गेल्याने त्यांना कुटुंबातील आपुलकी गरज आहे. त्यामुळे संस्थेने त्यांचा संभाळ करावा, अशी विनंती शेख यांनी केली. जोपडप्याची अवस्था पाहून एक क्षणाचाही विचार न करता त्यांना आधार दिला. याकाळात सुर्वसे आणि कांबळे यांनी त्यांचा आरोग्याची काळजी घेत त्यांना मानसिक आधारही पुरवला.

याबाबत 'वात्सल्याधाम'च्या प्रकल्प प्रमुख सुप्रभा आल्हाट यांनी सांगितले की, भावनीक दृष्ट्या हे दोघेही एकमेकांशी खुप जवळ होते. त्यांना आवश्यपक ती वैद्यकीय सुविधा याकाळात पुरविण्यात आल्या. जगात आपले कोणीच नाही या भावनेने ते मानसिक दृष्ट्या खचले होते. त्यामुळे त्यांना मानसिक आधार देण्यात आला. याठिकाणी घरासारखे वातावरण असल्याचे त्यांना देखील करमत. येथे दाखल झाल्यानंतर काही दिवसांतच जॉन यांचे निधन झाले. 

दोघांचा संभाळ करण्याबाबत आम्ही माहेरच्या वात्सल्यधामला विनंती केली होती. त्या दोघांना देखील एकत्र राहण्याची इच्छा होती. उचारादरम्यान ते बरेच दिवस एकमेकांना भेटले नाही. त्यांना दोघांना घेवून जाण्यासाठी जेव्हा संस्थेची लोक आली तेव्हा भेटले. त्यावेळी त्यांच्या चेह-यावर असलेले भाव पाहण्यासारखे होते.
- सत्यवान सुर्वसे, समाज सेवा अधिक्षक, ससून रुग्णालय

वात्सल्यधामची प्रमुख संस्था असलेल्या 'माहेर' संस्थेच्या माध्यमातून निराधार नागरिक, अत्याचार पीडित महिला यांच्यासह सुमारे दोन हजार नागरिकांना सेवा पुरविण्यात येत आहे. मेरी या खूप उत्साही आहेत. येथील अनेक कार्यक्रमात त्या हिरहिरीने सहभाग घेतात. या जोडप्याला चांगले आयुष्य देतोय याच समाधान आहे.
- सुप्रभा आल्हाट, प्रकल्प प्रमुख, वात्सल्यधाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

उजनी धरणात 113 TMC पाणी! भीमा नदीत 15 फेब्रुवारीपर्यंत पाणी तर शेतीचे आवर्तन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार; पुढे ‘या’ महिन्यात सुटणार दोनदा पाणी, वाचा...

Thalapathy Vijay News : मद्रास उच्च न्यायालयाकडून थलापती विजयला आणखी एक धक्का; दीड कोटींचा दंड भरावा लागणार

U19 World Cup: पुणेकराचं मार्गदर्शन अन् टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप! भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणारा मराठमोळा प्रशिक्षक

SCROLL FOR NEXT