Laptop
Laptop Sakal
पुणे

जुन्या, नव्या लॅपटॉपला ‘अच्छे दिन’! वर्क फ्रॉम होममुळे मागणी वाढली

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोना, (Corona) सततचा लॉकडॉउन (Lockdown) आदींमुळे ‘ऑनलाइन’चे (Online) सगळेच प्रकार तेजीत आले आहेत. शिक्षण (Education) व वर्क फ्रॉम होम करणाऱ्या नोकरदारांना लॅपटॉप (Laptop) गरजेचा बनला आहे. मात्र, नव्या लॅपटॉपच्या किमती जास्त असल्यामुळे नागरिकांची मागणी सेकंड हॅंड लपॅटॉपसाठी वाढत आहे. मात्र, त्याचा सध्या तुटवडा निर्माण झाला आहे. (Old new Laptop Demand Increase by Work from Home)

शाळा व महाविद्यालयांच्या तासिका या अजूनही ऑनलाइन पद्धतीनेच होत आहेत. विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप गरजेचा झाला आहे तर, नोकरदारांना लॉकडाउनमुळे घरूनच काम करावे लागत असल्याने त्यांनाही लॅपटॉपची खरेदी करावी लागत आहे. नोकरदारांना काम करताना वेगाने काम करण्याचे व जास्त साठवणक्षमता असलेले लॅपटॉप हवे असतात आणि चांगल्या कंपनीचे जे विविध सुविधा देतात त्या कंपनीलाही ग्राहक प्राधान्य देत आहेत.

असे आहे गणित

  • शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑनलाइन तासिकांसाठी ‘आय ३ प्रोसेसर’ आणि १ जीबी हार्डडिक्सची क्षमता असलेला लॅपटॉप लागतो

  • या सुविधा असलेल्या नवीन लॅपटॉपची किंमत ३० ते ३२ हजार तर जुन्याची सरासरी १७ ते १८ हजार रुपयांपर्यंत आहे

  • फक्त लेखन व टायपिंगसाठी लॅपटॉप खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ‘आय ३ प्रोसेसर’ व ‘४ जीबी रँम’ अशा सुविधा हव्या असतात

  • अशा प्रकारचा नवीन लॅपटॉप ३२ ते ३५ हजारांना तर जुना २० ते २२ हजारांना मिळतो

  • आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना कामाचा व्याप अधिक असल्याने त्यांना सुलभतेने काम करता यावे यासाठी लॅपटॉपमध्ये ‘आय ५ किंवा आय ७’ प्रोसेसर आणि ‘८ जीबी रँम’ आवश्यक

  • या सुविधा असलेला नवीन लॅपटॉप साधारणतः ४५ हजारांना तर जुना २८ ते ३५ हजारांना मिळतो

  • मागणी वाढल्याने लॅपटॉपच्या किमतीतही झपाट्याने वाढ

  • इलेक्ट्रॉनिक्स बाजारात जुन्या लॅपटॉपचा तुटवडा

गेल्या काही काळापासून लोक घरूनच काम करत असल्याने लॅपटॉपची मागणी वाढली आहे. लोक चांगल्या सुविधा असलेल्या लॅपटॉप खरेदी करण्याला प्राधान्य देत असल्याने बाजारात आवश्यक तेवढ्यात प्रमाणात साठा नाही.

- असद रशीद शेख, संगणकशास्त्राचा विद्यार्थी

मी एमपीएससीचा अभ्यास करतो. आता शिकवणीचे प्रत्यक्ष तास होत नसल्याने ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे माझा लॅपटॉपचा वापर वाढलाय. सध्या अभ्यास महत्त्वाचा आहे म्हणून महागडे लॅपटॉप विकत घ्यावे लागत आहे.

- रणजित सवाई, विद्यार्थी

ऑनलाइन शिक्षण व वर्क फ्रॉम होममुळे लॅपटॉपची मागणी वाढली आहे. लॅपटॉपमध्ये ग्राहकांना कोणकोणत्या सुविधा हव्यात, त्यावर लॅपटॉपची किंमत ठरते. जुन्या आणि नव्या लॅपटॉपची मागणी वाढली आहे. परंतु, त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. परिणामी दर वाढले आहेत.

- अक्षय शिवडे, विक्रेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

SCROLL FOR NEXT