no entry of corona 229 villages in Pune district  
पुणे

पुणेकरांसाठी चिंताजनक! ओमिक्रॉनचा पुण्यात एक, पिंपरीत सहा रुग्ण

महाराष्ट्राच्या चिंतेतही पडली भर

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉननं आता महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकली आहे. कारण डोंबिवलीपाठोपाठ पुणे आणि पिंपरीमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळं पुणेकरांच्या चिंतेतही भर पडली आहे. यामुळं महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे एकूण आठ रुग्ण आढळून आले आहेत.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबर रोजी नायजेरीयातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेली ४४ वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी-चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकूण सहा जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमिक्रॉन विषाणू आढळून आल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रविवारी संध्याकाळी दिला आहे. दरम्यान, पुणे शहरातील ४७ वर्षीय पुरुषाला देखील या नव्या व्हेरियंटचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या (एनसीएल) अहवालात स्पष्ट झालं आहे. यामुळं महाराष्ट्रातील ओमिक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णआंची संख्या आता आठवर पोहोचली आहे.

नायजेरियाहून आलेल्या महिलेमध्ये आजाराची लक्षण अत्यंत सौम्य असून इतर पाच जणांमध्ये कसलीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. या सहा जणांपैकी तिघेजण १८ वर्षांखालील असून त्यांनी कोणतीही कोरोनाची लस घेतलेली नाही. उर्वरित तिघांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. दोघांनी कोविशिल्ड तर एकानं कोव्हॅक्सिन लस घेतली आहे. हे सर्वजण सध्या पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, पुणे शहरात ओमिक्रॉन बाधित रुग्ण नेहमीच्या सर्वेक्षणात आढळला असून हा रुग्म १८ ते २५ नोव्हेंबर २०२२१ या काळात फिनलंड येथे गेला होता. २९ तारखेला थोडासा ताप आला म्हणून त्याने चाचणी केली असता तो कोविडबाधित आढळला आहे. या व्यक्तीनं कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले असून सध्या त्याला कोणतीही लक्षण नाहीत, प्रकृतीही स्थिर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT