पुणे

पुणे : 18 ते 44 गटासाठी ऑन स्पॉट लसीकरण बंद

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे ः महापालिकेतर्फे उद्या (सोमवारी) शहरात २०० ठिकाणी लसीकरण मोहीम आयोजित केली आहे. १८ ते ४४ या वयोगटासाठी केवळ आॅनलाइन बुकिंग करूनच लस मिळणार आहे. थेट केंद्रावर जाऊन (आॅन स्पॉट) लस मिळणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या गटासाठी शहरात ५८ केंद्र उपलब्ध आहेत. महापालिकेकडे शासनाकडून पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाली आहे, सोमवारी २०० ठिकाणी लसीकरण होणार आहे. ४५ ते पुढील वयोगटासाठी कोव्हीशील्डचे १२६ ठिकाणी लसीकरण होईल. १४ ते ४४ गटासाठी कोव्हीशील्डचे ५८ तर कोव्हीक्सीनची लस १६ ठिकाणी उपलब्ध असून, ती सर्व गटासाठी आहे. सर्व गटासाठी - आॅनलाइन नोंदणी सोमवारी सकाळी ८ वाजता सुरू होईल.

कोव्हीशील्ड (४५ ते पुढील वयोगट)

- ५ एप्रिल पूर्वी पहिला डोस (८४ दिवस) घेतला आहे त्यांना २० टक्के लस आॅनलाइन नोंदणी द्वारे उपलब्ध.

- फ्रंटलाइन कर्मचारी व थेट केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी २० टक्के लस राखीव

- ३० टक्के लस आॅनलाइन नोंदणी करून आलेल्यांच्या पहिल्या डोससाठी

- ३० टक्के लस थेट केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांच्या पहिल्या डोससाठी राखीव

कोव्हीशील्ड (१८ ते ४४ वयोगट)

- १०० टक्के लस आॅनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध

- आॅनस्पॉट लस मिळणार नाही.

कोव्हॅक्सीन (१८ ते पुढील वयोगट)

- ३० मे पूर्वी पहिला डोस घेणाऱ्यांना दुसरा डोस मिळणार

-५० टक्के लस आॅनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध

- ५० टक्के लस थेट केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांसाठी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : कांदिवलीत डंपरची स्कूटीला धडक; थरारक अपघातात दुचाकी चालक बचावला

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT