feet.jpg 
पुणे

पुणे : विहीरीत पडून दीड वर्षाच्या बालकाचा मृत्यू

दत्तात्रेय कदम

मांडवगण फराटा (पुणे) : शिरसगाव काटा (ता. शिरुर) येथे विहीरीत पडून दीड वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून शिरसगाव काटा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेत ओंकार बाळासाहेब जांभळकर (वय - १८ महिने ) असे मृत्यु झालेल्या चिमकुल्याचे नाव आहे. तर याबाबत सोमनाथ जांभळकर यांनी फिर्याद दिली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल ( दि.३१ अॉगस्ट ) रोजी सायंकाळच्या सुमारास घरापासून ओंकार हा खेळत असताना अचानक गायब झाला. काही वेळानंतर ओंकार गायब असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी आजुबाजूला शोध घेणे सुरु केले. मात्र, ओंकार दिसला नाही. घरापासून काही अंतरावर विहिर आहे. त्याचबरोबर या परिसरात बिबट्याचाही वावर असल्याने घरापासून सुमारे एक हजार फुटांच्या अंतरावर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. ओंकारला बिबट्याने तर नेले नसेल ना अशी शंका उपस्थित होत असल्याने अनेकांनी शोधकार्य सुरु ठेवले. वनविभागाचे कर्मचारी गांधले यांनी स्थानिकांच्या मदतीने उसाच्या शेतात शोधाशोध केली. मात्र, ओंकारचा काही पत्ता लागला नाही. दुसरी शक्यता विहीरीत पडल्याची असल्याने विहीरीत शोधण्याचे ठरले. मात्र विहीरीत सुमारे ४५ फूट पाणी होते. त्यात या परिसरात रात्रीचे लोडशेडींग असल्याने विहीरीतील पाणी काढून शोध घेणे कठीण होते. मात्र वीज मंडळाचे पुणे जिल्ह्याचे अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार, केडगाव उपविभागाचे अभियंता येडके, कर्मचारी मुलाणी यांच्या सहकार्याने मध्यरात्री बाराच्या सुमारास शेजारील असलेल्या विहिरीत चार विद्युत पंपाच्या साहाय्याने पाणी उपसा केला असता पहाटेच्या सुमारास ओंकारचा मृतदेह मिळाला.

दरम्यान, पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन शिक्रापूर येथे शवविच्छेदन केल्यानंतर सदर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या शोध कार्यासाठी प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पद्माकर घनवट, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सदस्य प्रमोद बलकवडे, पोलिस पाटील भाऊसाहेब गायकवाड, वनविभागाचे अधिकारी, तलाठी टिळेकर, माजी सरपंच सतिश चव्हाण, नंदकुमार कदम, गणेश माने, मांडवगण पोलिस चौकीचे जमादार श्रावण गुपचे, किरण डुके यांनी सहकार्य केले. या प्रकरणी शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मांडवगण पोलीस चौकीचे जमादार श्रावण गुपचे हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दरवर्षी बाळंतपण! वंशाला हवेत दोन दिवे; पाचव्यानंतर सहावं पोटात, डॉक्टरने पती-पत्नीला झापझाप झापलं; व्हिडीओ व्हायरल

'सुनेला सासरी जुळवून घे...' म्हणणं क्रूरता नाही; सुप्रीम कोर्टाचे मोठे निरीक्षण, वैवाहिक वादांत कायद्याचा गैरवापर टाळा

IPL 2026: Mumbai Indians च्या अपयशानंतर हार्दिक पांड्यानं उचललं मोठं पाऊल; जगभरातील चाहत्यांना बसला धक्का, नेमकं काय केलं?

Metro Lines 5A and 12A: कल्याण-नवी मुंबई प्रवास आणखी सोपा होणार! MMRDA नवे मेट्रो नेटवर्क उभारणार; मार्ग कसा असणार?

Pune Car Accident : पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार; दारूच्या नशेत 19 वर्षीय तरुणाने भरधाव चालवली कार, गाडी थेट गरवारे पुलावरून कोसळली खाली

SCROLL FOR NEXT