one arrested in Hadapsar for carrying pistol found four live cartridges 
पुणे

हडपसरमध्ये तडीपार गुंडाला अटक; गावठी पिस्टल, चार जिवंत काडतुसे सापडली

मोहिनी मोहिते

हडपसर : गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका गुन्हेगाराला अटक केली आहे. तसेच हि कारवाई करत असताना एका तडीपार गुन्हेगाराला जेरबंद केले आहे. 

अजय उर्फ डी. दिलीप लाळगे (वय २६, रा. भगतसिंग कॅालनी, गोंधळेनगर, हडपसर) असे पिस्टल बाळगलेल्या आरोपीचे नाव आहे. तर तडीपार असलेल्या विनीत रविंद्र इंगळे (वय २१, रा. राहूल कॅालनी, सातववाडी, हडपसर) याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पोलिस कर्मचारी नितीन मुंढे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गोंधळेनगर येथील लोंखडी पुलाजळ लाळगे हा रस्त्यावर बुलेट मोटार सायकलवर बसलेला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. त्यानंतर पोलिस हवलदार प्रदिप सोनवणे, समिर पांडूळे, निखील पवार, प्रशांत धुमाळ, शशिकांत नाळे, प्रशांत टोणपे यांनी सापळा रचून लाळगे व इंगळे याला अटक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरिक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Vijay meeting : अमित शाह, विजय यांची गुप्त भेट? दक्षिणेतील ५ राज्यांचा वर्षानुवर्षांचा प्रश्न मार्गी लागणार; आज मोठी बैठक

US National Debt : अमेरिकेवर कर्जाचा डोंगर! पहिल्यांदाच राष्ट्रीय कर्ज ४० ट्रिलियन डॉलर पार; जगातील महासत्तेसमोर मोठे आर्थिक संकट?

Congress Lok Sabha: लोकसभेच्या जागा २५ वर्षांसाठी गोठवा; काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मागणी, देशातील आठशे शहरांत ‘छात्रों की गूंज’

मध्यप्रदेशातून बंदुका आणून ५० हजारांत विकणारा सांगलीचा तरूण जेरबंद! मध्यप्रदेशसह माढा, पंढरपूर, सांगोला, आटणी तालुक्यातील ८ जण अटक, १७ गावठी बंदुका जप्त, वाचा...

Maharashtra weather update : महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान नाही? कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे; IMDचा अंदाज

SCROLL FOR NEXT