Sandalwood sakal
पुणे

पुणे : चंदन तस्करी प्रकरणात एकास पकडले

102 किलो चंदनाचे लाकडाचे तुकडे जप्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : चंदनाच्या लाकडांची तस्करी करणाऱ्यास खंडणी विरोधी पथकाने अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून 102 किलो वजनाचे ओल्या चंदनाच्या लाकडाचे तुकडे, कार असा साडे पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.लक्ष्मण भीमा गायकवाड (वय 42 , रा. तरडोबाचीवाडी, शिरूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी नगर रस्ता भागात गस्त घालत होते. त्यावेळी पेरणे फाटा परिसरातून कारमधुन निघालेल्या एका व्यक्तीकडे चंदनाच्या लाकडाचे तुकडे असल्याची खबर पोलिसांना मिळाली.(sandalwood smuggling case)

त्यानुसार, पोलिसांनी संबंधीत कार अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कार चालकाने पोलिसांना पाहून कार घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यास पाठलाग करुन पकडले. पोलिसांनी त्याच्या गाडीची तपासणी केली, त्यावेळी त्यामध्ये 102 किलो वजनाचे ओल्या चंदनाच्या लाकडाचे तुकडे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले. गायकवाड हा चंदनाची झाडे कापून नेणाऱ्या चोरट्यांकडून चंदनाची लाकडे विकत घेतो, त्यानंतर त्या चंदनाची तस्करी करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. हि कारवाई पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, राहुल उत्तरकर, विजय गुरव, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे यांच्या पथकाने केली.(pune news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT