One Arrested for possessing gun by Chasing in film style 
पुणे

फिल्मीस्टाईलने पाठलाग करत गावठी कट्टा बाळगणाऱ्यास केले अटक

सकाळ वृत्तसेवा

लोणावळा: लोणावळा येथील रायवूड गार्डन परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणास लोणावळा शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली. अंकुश ज्ञानदेव लोखंडे (वय-२२, रा.गुरव वस्ती, ओळकाईवाडी, लोणावळा, ता.मावळ) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

पुण्यात तिघी प्रथम लिफ्ट मागायच्या आणि मग...

लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता.१८) रात्री रायवूड गार्डन येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात एक तरुण गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती लोणावळा शहरचे निरीक्षक बी.आर.पाटील यांना मिळाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सहाय्यक पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस नाईक वैभव सुरवसे, पोलिस कॉन्स्टेबल अजीज मेस्त्री, राजेंद्र मदने, पवन कराड, मनोज मोरे यांनी संशयित तरुणाचा शोध घेतला असता एक तरुण संशयितरित्या थांबलेला दिसला. त्यास हटकले असता तो पळून जाऊ लागला.

रशियन वैमानिकांनी पुण्यात उडविले सुखोई 30 

पोलिस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करत अंकुश गुरव यास शिताफीने जेरबंद केले. त्याची झडती घेतली असता, त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचा कट्टा खोचलेला मिळून आला. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव स्वामी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT