पुणे

पुणे : विद्यापीठात तरुणीची छेड काढणारा एकजण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तरुणीची छेड काढून पळून जाणाऱ्याला सुरक्षा रक्षकांनी पाठलाग करून झाडीत लपून बसलेल्याला अवघ्या 15 मिनिटांत पकडून पोलिसांच्या हवाली केले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. सखाराम त्र्यंबक वर्पे (सध्या रा. बोपोडी, मुळ रा. बीड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

विद्यापीठात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोस्ट ऑफिसजवळून वसतिगृहाच्या दिशेने जात होती. त्यावेळी एकजण तेथे येऊन तिची छेड काढली. घाबरलेल्या या विद्यार्थिनीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी पळून जाऊ लागला. मुलीचा आवाज ऐकल्याने जवळच असलेल्या सुरक्षारक्षकाने पोस्ट ऑफिसच्या दिशेने धाव घेतली. वायरलेसवरून या घटनेची माहिती देऊन पेट्रोलिंग जीपला बोलविण्यात आले.

आरोपी एलिस उद्यानात लपल्याचे कळाले. सुमारे सात ते आठ सुरक्षा रक्षकांनी सर्च लाईटच्या मदतीने त्याला झुडपातून पकडले. त्याला चतुःश्रृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे, असे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT