vikas shinde.jpg 
पुणे

अंगावर वीज पडून भोरमध्ये एकाचा मृत्यू 

किरण बधे

नसरापूर (पुणे) : आज विजांच्या गडगडाटासह जोरदार झालेल्या पावसात भोंगवली (ता. भोर) येथे वीज अंगावर पडून भोंगवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे चालक विकास चंद्रकांत शिंदे (वय 30) यांचा जागीच मृत्यू झाला. 


भोर तालुक्‍याच्या महामार्ग पट्ट्यात व सारोळा भोंगवली परिसरात विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. भोंगवली गावच्या हद्दीत विकास शिंदे त्यांच्या पत्नीसह गावाकडे जात असताना पाऊस आल्याने रस्त्या बाजुच्या वीट भट्टीजवळ थांबले होते. त्यावेळी जोराच्या कडकडाटासह वीज कोसळली. ही वीज शिंदे यांच्या अंगावर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 


याबाबत संतोष रघुनाथ शेडगे यांनी राजगड पोलिस ठाण्यास खबर दिली दिली. विकास शिंदे यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत. अनेक रुग्णांना वाहन चालक रूपात जीवदान देणारा रात्री अपरात्री रुग्ण व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हाकेला धावून जाणारा, सुस्वभावी अशी विकास शिंदे यांची ओळख होती. तालुक्‍याच्या आरोग्य विभागात या घटने बद्दल दुःख व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT