corona vaccination Sakal
पुणे

लशीचा पहिला डोस शंभर टक्के पुणेकरांनी घेतला

पुण्यात कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस शंभर टक्के पुणेकरांनी घेतला. दुसरा डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ५५ टक्के आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुण्यात कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस शंभर टक्के पुणेकरांनी घेतला. दुसरा डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ५५ टक्के आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस ८४ दिवसांनी घ्यावा लागतो. दोन डोसमधील दिवस कमी केल्यास लवकरच पुणे पूर्ण लसीकरण झालेले शहर असेल असे चित्र आहे.

नवी मुंबईमध्ये १९ ऑक्टोबरला शंभर टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतल्याचे वृत्त आहे. नवी मुंबईमध्ये ११, ०७, २३३ नागरिक लसीकरणाच्या वयायोग्य होते. पुण्यामध्ये ही संख्या तब्बल २६ लाखांहून अधिक आहे. पुण्यात सोळा फेब्रुवारीपासून लसीकरण सुरू झाले. त्याला सुरवातीपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू झालेल्या लसीकरणासाठी मोठ्या रांगा लसीकरण केंद्रांवर लागल्या होत्या.

सरकारी केंद्रांबरोबरच खासगी रुग्णालयांमधील लसीकरण शिबिरांनाही पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. खासगी केंद्रांवर पुणेकरांनी पैसे देऊन लस घेतली. कारण, कोरोनाच्या उद्रेकाची सर्वाधिक दाहकता पुणेकरांनी अनुभवली होती.

पुणे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शंभर टक्के लसीकरण झाले. पुण्यात १८ पेक्षा जास्त वय असलेल्या २६ लाख ४५ हजार ७०० पात्र नागरिकांना लसीकरणाचे उद्दिष्ट होते. मात्र, प्रत्यक्षात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ३१ लाख ५३ हजार २०५ झाली आहे. त्यामुळे पहिल्या डोस घेणाऱ्या पुणेकरांची संख्या शंभर टक्क्यांपेक्षा जास्त आहे.’’

पुण्यातील १७ लाख ८८ हजार ७४५ जणांनी लशीचा दुसरा डोस घेतला आहे. हे प्रमाण सुमारे ६७ टक्के आहे. लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये ८४ दिवसांचे अंतर आहे. त्यामुळे दुसरा डोस देण्याची प्रक्रिया आता सुरू आहे. त्यासाठी मुबलक लस आता उपलब्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: मॉन्सूनच्या वाटचालीस वातावरण पोषक; विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेचा ‘रेड अलर्ट’

विधान परिषद निवडणूक! मतदार सदस्यांना जमा करावी लागणार शस्त्रे, पोलिस अधीक्षकांनी काढले आदेश; सोलापूर जिल्ह्यात ६१६ मतदार, २२ जणांना वैयक्तिक बंदोबस्त

Panchang 27 May 2026 : पद्मिनी एकादशीसह बुधवारी खास योग! जाणून घ्या संपूर्ण पंचांग

आजचे राशिभविष्य - २७ मे २०२६

करिअर वेध : पराकोटीचा ध्यास

SCROLL FOR NEXT