नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्यातील नव्वद माध्यमिक शाळांचा सरासरी निकाल ९७.७७ टक्के लागला. परीक्षा दिलेल्या ५ हजार ४०० पैकी ५ हजार २८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ४७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. २ हजार ८०४ मुलांपैकी २ हजार ७१६ मुले पास झाली. तर, २ हजार ५९६ मुलींपैकी २ हजार ५६४ मुली पास झाल्या. निकालात विद्यार्थिनींनी बाजी मारली.
मागील वर्षी तालुक्याचा सरासरी निकाल ८२.७२ टक्के लागला होता. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी निकालात १५.०५ टक्के वाढ झाली. तालुक्यातील ९० शाळांपैकी ४७ शाळांचे निकाल १०० टक्के, तर ३५ शाळांचा निकाल नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त लागला, मागील वर्षी सात शाळांचा निकाल १०० टक्के लागला होता. कोरोनाची पार्श्वभूमी असताना या वर्षी वाढलेला निकाल ऐतिहासिक असल्याचे मत मुख्याध्यापक सबनीस विद्यालयाचे रवींद्र वाघोले यांनी दिली.
शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा पुढील प्रमाणे : गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यालय नारायणगाव, विद्या विकास मंदिर राजूरी, सरदार पटेल विद्यालय आणे, अंजुमन हायस्कूल जुन्नर, श्री संभाजी विद्यालय बोरी, विघ्नहर विद्यालय ओझर, शिवनेरी विद्यालयल धोलवड, आणे माळशेज विद्यालय मढ, पुष्पावती विद्यालय डिंगोरे, शासकीय आश्रमशाळा खिरेश्वर, शासकीय आश्रमशाळा अंजनावळे, श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मेडियम स्कूल नारायणगाव, सरस्वती विद्यालय उदापूर, न्यू इंग्लिश स्कूल खामुंडी, शारदाबाई पवार विद्यालय आंबेगव्हाण, कुलस्वामी खंडेराय विद्यालय वडज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तांबे, ज्ञानदा विद्यालय मंगरूळ, शासकीय आश्रमशाळा सोमतवाडी, शितलेश्वर विद्यालय सीतेवाडी, श्री समर्थ मधुकरराव विद्यालय चिंचोली, श्री कुलस्वामी खंडेराय विद्यालय हिवरे तर्फे नारायणगाव, श्री लेण्याद्री विद्यालय बल्लाळवाडी, अजित पवार विद्यालय देवळे, ग्रामोन्नती मंडळ माध्यमिक विद्यालय गुंजाळवाडी, न्यू इंग्लिश स्कूल कांदळी, न्यू इंग्लिश स्कूल धामणखेल, न्यू इंग्लिश स्कूल करंजाळे, न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बोरी, ज्ञानदा विद्यालय गोद्रे, शिवछत्रपती विद्यालय आळेफाटा, श्री जगदंबा विद्यालय जाधववाडी, जे. आर. गुंजाळ इंग्लिश स्कूल आळेफाटा, शेठ रतनचंद मुथा इंग्लिश स्कूल जुन्नर, ज्ञानराज इंग्लिश मेडियम स्कूल जुन्नर, शंकरराव बुट्टे पाटिल इंग्लिश स्कूल जुन्नर, कपरदिकेश्वर इंग्लिश मेडियम स्कूल ओतूर, हांडे देशमुख इंग्लिश मेडियम स्कूल आळेफाटा, विद्यानिकेतन पी. एम. हायस्कूल साकोरी, प्रा. रामकृष्ण इंग्लिश मेडियम स्कूल निवृत्तीनगर, हिरा इंग्लिश मेडियम स्कूल खानापूर, शासकीय आश्रमशाळा सोनावळे, न्यू इंग्लिश स्कूल निमदरी, सावळेरामबुवा दांगट विद्यालय उंब्रज २, गुरुगोविंद देव प्रशाळा बोरी, इंदिरा गांधी विद्यालयल रानमाळा, न्यू इंग्लिश स्कूल राजूर,
तालुक्यातील इतर शाळांचे निकाल पुढील प्रमाणे : शंकरराव बुट्टे पाटिल विद्यालय जुन्नर : ९९.५८, चैतन्य विद्यालय ओतूर : ९९.२८, सुभाष विद्यामंदिर पिंपळवंडी : ९४.६६, ज्ञानमंदिर विद्यालय आळे : ९७.८८, श्री महालक्ष्मी विद्यालयल उंब्रज : ९८.९३, बेल्हेश्वर विद्यालय बेल्हे : ९९.०५, अण्णासाहेब आवटे विद्यालय जुन्नर : ९७.२२, छत्रपती विद्यालय येणेरे : ९८.४६, कृष्णराव मुंढे विद्यालय जुन्नर : ९२.०७, न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक : ९९.२१, एम. जी. हायस्कूल आळे : ९७.५३, हिंदमाता विद्यालय कांदळी : ९१.४६, श्री. ब्राह्मनाथ विद्यालय परुंडे : ९४.२८, पंडित नेहरू विद्यालय निमगाव सावा : ९२.३०, सद्गुरू एस. एम. विद्यालय पिंपरी पेंढार : ९७.९७, श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव : ९६.२०, श्री संत गाडगेबाबा महाराज विद्यालय ओतूर : ९७.०३, संत तुकाराम विद्यालय निरगुडे : ९८.२४, शिवनेर विद्यालय आर्वी : ८२.६०, महात्मा फुले विद्यालय खोडद : ९२, संत गाडगे महाराज शासकीय आश्रमशाळा ओतूर : ८५.३६, न्यू इंग्लिश स्कूल आपटाळे : ८९.३९, शासकीय आश्रमशाळा तळेरान : ९३.८७, शासकीय आश्रमशाळा आणे : ९६.८७, आर. बी. देवकर विद्यालय वडगांव आनंद : ९७.५३, येडेश्वर विद्यालय येडगाव : ९६.२२, सावित्रीबाई फुले विद्यालय ओतूर : ९२.५९, वीर सावरकर विद्यालयल बल्लाळवाडी : ९०.९०, शासकीय आश्रमशाळा खटकाळे : ९०, आदिमाया शक्ती विद्यालय इंगळुण : ९५.१२, न्यू इंग्लिश स्कूल खामगाव : ९७.२२, ज्ञानदा कन्या विद्यालयल नारायणगाव : ९७.६१, शिवांजली विद्यालय चाळकवाडी : ९२.५९, संत गाडगेबाबा महाराज विद्यानिकेतन पिंपळगाव जोगे : ९६.२९, शासकीय आश्रमशाळा जुन्नर : ९७.६७, न्यू इंग्लिश स्कूल हिवरे खुर्द : ९४.७३, अजित पवार विद्यालय घाटघर : ५०, न्यू इंग्लिश स्कूल अंबोली : ९१.६६, माध्यमिक शाळा आलमे : ८९.४७, शासकीय आश्रमशाळा कोळवाडी : ९७.४३, अजित पवार विद्यालय खडखुबे : ८३.३३.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.