0murder_93.jpg
0murder_93.jpg 
पुणे

पुणे : भरवस्तीत धारदार शस्त्राने वार करुन एकाचा खून

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भरवस्तीत रात्रीच्या सुमारास एका नागरिकावर धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोसायटीसमोर मित्रांसमवेत गप्पा मारत थांबलेल्या एकावर ओळखीच्या तिघांनी तरुणांनी करुन खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास धनकवडी येथे घडला.

रामदास शामराव शिळीमकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विकास चव्हाण (वय 44, रा. चव्हाणवाडी, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन ज्ञानेश्‍वर वानखेडे याच्यासह तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण हे त्यांचे मित्र रामदास शिळीमकर, सुधीर मांगले व अन्य मित्रांसमवेत शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास धनकवडीतील योगी सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी वानखेडे हा त्याच्या साथीदारांसमवेत तेथे आला. त्याने शिळीमकर यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर वानखेडे याने त्यांच्याकडील धारदार शस्त्राने शिळीमकर यांच्या डोक्‍यावर, छातीवर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर तिघेजण तेथून पळून गेले. दरम्यान, या हल्ल्यामध्ये शिळीमकर यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्यांचा मृत्यु झाला.

शिळीमकर यांच्या खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही, आरोपींना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होईल, असे पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT