Crime_Suicide 
पुणे

पोलिस कमिशनर ऑफिसमध्येच एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; पुण्यातील घटना

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पोलिसांनी खंडणी मागितल्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत एकाने शनिवारी (ता.१३) सायंकाळी पाच वाजता ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यास उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. नवनाथ थोरात असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक मारुती शिंदे यांनी चतृःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ थोरात याच्याविरुद्ध मंचर पोलिस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मात्र संबंधीत गुन्हा हा खोटा असल्याचे नवनाथचे म्हणणे होते. शनिवारी तो पोलिस अधिक्षकांना त्याच्याविरुद्ध पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचे सांगणार होता. दरम्यान, तो शनिवारी सायंकाळी ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयात आला. तेथे परकीय नागरीक नोंदणी विभागाच्या कार्यालयासमोरील क्वार्टर गार्डच्या भिंतीजवळील बाकड्यावर बसून विष प्राशन केले. हा प्रकार तेथे ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यास तत्काळ रुग्णालयात हलविले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पवार करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bisleri Water: बिसलेरीचं पाणी पिण्यासाठी असुरक्षित? तपासणीत धक्कादायक प्रकार; FSSAI ची मोठी कारवाई!

Milk Rate: दूध उत्पादकांना दिलासा; मांढळ भागात नवे दर लागू ;हाय व लो फॅटचे नवीन दरपत्रक लागू; फॅटनुसार प्रतिलिटर ७८ रुपयांपर्यंत दर

रश्मिका मंदाना संतापली! कुटुंबीयांना ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं; म्हणाली, 'मी गप्प बसत नाही'

Latest Marathi News Live Update: शंभराव्या संमेलनाच्या अध्यक्षांची उद्या निवड

INDIA A VS PAKISTAN A: पाकिस्तानकडून वाईट हरले, आता टीम इंडिया Semi Final ला कशी पोहोचणार? पुन्हा एकदा पाकड्यांचं तोंड पाहावं लागणार; पुढचा सामना केव्हा होणार?

SCROLL FOR NEXT