Corona l0.jpg 
पुणे

पुणेकरांचा निष्काळजीपणा नडला; ग्रीन झोन ठरलेला हा भाग पुन्हा कोरोनाच्या विळख्यात

सकाळवृत्तसेवा

औंध (पुणे) : पहिल्या लाॅकडाऊनपासून ते आतापर्यंत औंध किंवा गावठाण परिसरात एकही रुग्ण आढळून आला नव्हता. परंतु, आज पहिला स्थानिक रुग्ण आढळल्याने या परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. संबंधित रुग्ण हा कोथरूडच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात काही दिवसांपूर्वी पत्नीच्या उपचारासाठी गेला असता लागण झाल्याची  माहिती मिळाली आहे.

संबंधित रुग्णाची पत्नी निगेटिव्ह असून एकट्यालाच कोरोनाचा संसर्ग झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. हा रुग्ण कुणाकुणाच्या संपर्कात आला होता याची माहिती घेऊन संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. औंधमधील त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे व संबंधित सोसायटीत निर्जंतुकीकरण प्रक्रिया करण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त जयदीप पवार यांनी सांगितले.

आजपर्यंत या परिसरातील नागरिक, प्रशासकीय यंत्रणा, वैद्यकीय कर्मचारी व अधिकारी, सफाई कामगार, आरोग्य विभाग यांनी चांगली खबरदारी घेतली होती. परंतु, अखेर आज स्थानिक रुग्ण सापडला असून औंधमध्ये कोरोनाने प्रवेश केल्याने परिसरातील नागरिकांनी काळजी घेण्याची जबाबदारी वाढली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

परदेश वारी करुन आलेले व २९ मार्च रोजी कोरोनाबाधीत झालेले बाणेर येथील पती पत्नी हे औंध प्रभागातील पहिले रुग्ण ठरले होते. परंतु यशस्वी उपचारानंतर ते दुरुस्त झाले होते यानंतर बरेच दिवस प्रभागात कोरोना रुग्ण आढळून आलेला नव्हता. औंध परिसरात एम्स रुग्णालयात इतर आजारामुळे  दाखल झालेला एक रुग्ण काही दिवसांनी पाॅजिटीव्ह आढळून आला होता परंतु तो स्थानिक नव्हता व त्याला तात्काळ वायसीएम रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यामुळे औंध भागातील एकही रुग्ण आजपर्यंत आढळून आला नव्हता.

त्यानंतर २ मे रोजी बोपोडीत एक महिला आढळून आली होती परंतु तिच्यावरही यशस्वी उपचार सुरु आहेत.ग्रीन झोन असलेल्या औंधमध्ये आज सापडलेल्या रुग्णामुळे पुन्हा झोन बदलण्याची शक्यता आहे. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असले तरीही नागरीकांनी विनाकारण बाहेर न फिरणे, मास्क वापरणे व सुरक्षित अंतर ठेवणे याचे पालन करावे असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : नगर-श्रीगोंदा मार्गांवर तेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT