Corona l0.jpg 
पुणे

मुळशीकर सावधान ! तालुक्याच्या प्रवेशद्वारावर झालीये कोरोनाची एन्ट्री

सकाळवृत्तसेवा

बावधन (पुणे) : मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या भूगावमध्ये कोरोनाची एन्ट्री झाली आहे. येथील 55 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. वास्तविक लाॅकडाउनच्या काळात पोलिस, महसूल प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने कोरोनाचा मुळशीतील शिरकाव थांबविला होता. परंतु, प्रशासनाने लाॅकडाउन शिथिल केल्यानंतर मात्र कोरोना आता मुळशीच्या वेशीवर आल्याने मुळशीकरांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.

भूगावमधील व्यक्तीच्या कोथरूड येथील भावाला काही दिवसांपूर्वी  कोरोनाची लागण झाली होते. त्यांच्या संपर्कात ही व्यक्ती आली  होती. भावाला कोरोना झाल्याने या व्यक्तीनेही खबरदारी म्हाणून स्वतःची खासगी ठिकाणी कोरोना चाचणी करून घेतली. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. या व्यक्तिच्या संपर्कातील घरातील 3 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. ही व्यक्ति राहात असलेली भूगावची इमारत सिल करून परिसरात औषध फवारणी करण्यात आल्याची माहिती सरपंच निकिता सणस यांनी दिली. गटविकास अधिकारी संदीप जठार, पोलीस उपनिरिक्षक अनिल लवटे व श्रीकांत जाधव यांनी परिसराची पाहणी केली. 

कोरोनाचा धोका कायम असल्याने नागरिकांनी मास्क वापरावेत, सोशल डिस्टंसिंग पाळावं, खबरदारीच्या सर्व उपाययोजना अंमलात आणत रहाव्यात असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अजित कारंजकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT