Corona l0.jpg
Corona l0.jpg 
पुणे

अरे बापरे ! पुण्याहून कोरोना बाधित उरुळी कांचनला गेला अन्‌... पहा काय घडले

जनार्दन दांडगे

उरुळी कांचन (पुणे) : सर्दी व खोकल्याने हैराण असतानाही, पुण्यातील भवानीपेठ परिसरातून उरुळी कांचन येथील नातेवाइकाच्या घरी तीन दिवसापूर्वी हवापालट करण्यासाठी आलेल्या पन्नास वर्षीय व्यक्तीचा पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी (ता. 10) सकाळी मृत्यू झाला. मृत्यूनंतर संबंधित व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्याने, उरुळी कांचनवर पुन्हा कोरोनाचे संकट घोंगाऊ लागले आहे. 

उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत वीस दिवसापूर्वी एक सत्तेचाळीस वर्षीय महिला व तिच्यावर उपचार करणारा एक डॉक्‍टर असे दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. वरील दोन रुग्णाच्या धक्‍क्‍यातून उरुळी कांचनवासीय सावरत असताना, पाहुणा म्हणून आलेला पुण्यातील एक रुग्ण आढळून आल्याने उरुळी कांचन परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. उरुळी कांचन परिसरातील तिसरा तर पूर्व हवेलीमधील हा दहावा रुग्ण ठरला आहे. 

दरम्यान, उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या प्रमुख डॉ. सुचिता कदम यांनीही पुण्याहून उरुळी कांचन येथील नातेवाइकाकडे आलेली पन्नास वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. तर पुण्याहून आलेली व्यक्ती उरुळी कांचन येथील नातेवाइकांच्या घरी तीन तासाहून अधिक काळ वावरली असल्याने, उरुळी कांचन येथील नातेवाईक व त्यांच्या घरातील पंधरा जणांना कोरोनाच्या आयसीएमआर चाचणीसाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात तत्काळ हलविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. कदम यांनी दिली. 

सर्दी व खोकल्याने हैराण असतानातही, पुण्याहून एक व्यक्ती उरुळी कांचन येथील नातेवाइकांकडे शुक्रवारी (ता. 8) सांयकाळी पाचच्या सुमारास आली होती. पुण्याहून आलेली व्यक्ती घराच्या बाहेर खोकत असल्याचे शेजारांच्या लक्षात येताच, काही जणांनी ही बाब ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कळवली. ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ हालचाली करून, संबंधित व्यक्तीला पुढील उपचारासाठी पुण्यातील नायडू रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारादरम्यान व्यक्तीचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. मृत्यूनंतर संबंधित व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे समजले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. कदम म्हणाल्या, "कोरोना बाधित व्यक्ती उरुळी कांचन येथील नातेवाइकांच्या घरी तीन तासाहून अधिक काळ वावरली असल्याने, नातेवाईक व त्याच्या घरातील पंधरा जणांच्या घशातील द्रव घेऊन त्यांची चाचणी करण्यात येणार आहे. उरुळी कांचन येथील नातेवाईक रहात असलेल्या वस्तीचे रविवारी रात्री पासूनच निर्जंतुकीकरण करण्यास सुरवात केली आहे. उरुळी कांचन येथील नातेवाईक व त्याच्या घरातील पंधरा जणांचा तपासणी अहवाल आल्यानंतरच, पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.' 

कटेंन्मेंट झोनची (प्रतिबंधित क्षेत्र) मुदत वाढणार 

उरुळी कांचन येथे एकवीस दिवसापूर्वी एक सत्तेचाळीस वर्षीय महिला व तिच्यावर कदमवाकवस्ती येथील खासगी रुणालयात उपचार करणारे उरुळी कांचन येथील एक डॉक्‍टर असे दोघेजण कोरोना बाधित असल्याचे आढळुन आले होते. यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मागील वीस दिवसापासून उरुळी कांचन व परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे. सत्तेचाळीस वर्षीय कोरोना बाधित महिला व डॉक्‍टर हे दोघेही उपचार घेऊन घरी परतल्याने, प्रशासन मंगळवारपासून (ता. 12) उरुळी कांचनचे प्रतिबंधित क्षेत्र हटविण्याच्या मार्गावर होते. मात्र वरील रुग्ण सापडल्याने, कटेंन्मेंट झोनची मुदत मंगळवारी वाढणार की संपणार हे उरुळी कांचन येथील नातेवाईक व त्यांच्या घरातील पंधरा जणांचा कोरोना अहवाल काय येतो यावर ठरणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: देशभक्तांमध्ये सर्वजण येतात... आरोप करणारे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार!

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलीस अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी

SCROLL FOR NEXT