corona.jpg 
पुणे

आळंदीतील 'त्या' महिलेच्या रिपोर्टबाबत संभ्रम; पालिकेने निर्जंतुकीकरण केले पण...

विलास काटे

आळंदी (पुणे) : आळंदी मरकळ रस्त्यावर एका कॉलनीतील महिला कोरोना पॉझिटिव्ह असून पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात गेली चार दिवसांपासून उपचार घेत असल्याचे खुद्द तिच्या नातेवाईकांनी सांगितले. नातेवाईक होमक्वारंटाईन झाले आणि पालिकेने घरी जावून औषध फवारणीही केली. मग एरीया सिल का केला नाही याबाबत स्थानिक नागरिक अचंबित झाले. मात्र, आमच्याकडे अद्याप महिलेचा रिपोर्ट आला नाही असे सांगून अद्याप पालिकेने एरिया सिल केला नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. दरम्यान पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात उपचार घेत असलेली ही महिला पॉझिटिव्ह की निगेटीव्ह याबाबत संभ्रम कायम आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आळंदीत आणि परिसरातील गावामधे कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. आजही गोपाळपूरातील तानाजीनगरमधील एकास कोरोनाची बाधा झाली आहे. यापूर्वी त्याच घरातील एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आळंदीत तब्बल तीसहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा गेल्या पंधरा दिवसांत झाली. या पार्श्वभूमीवर आळंदीत संपूर्ण लॉकडाउन घोषित केला. लॉकडाउन घोषित करण्यापूर्वीच आळंदी मरकळ रस्त्यावरील एका कॉलनीतील महिला कोरोना पॉझिटिव्ह असून पिंपरीत उपचार घेत असल्याचे तिच्या मुलांनी सांगितले. आजूबाजूच्या घरांमधे नागरिक याबाबत चर्चा करू लागले. काहींनी पालिकेला कळवले. घरातील सर्वांना क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला. तसेच पहिल्या दिवशी महिलेला बालेवाडी येथील कोविड सेंटरला नेले. तेथे श्वसनाचा त्रास झाल्यावर पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात नेल्याची माहिती मुलांनी दिल्याचे शेजारील नागरिकांनी सांगितले.

परिणामी ही महिला राहत असलेल्या कॉलनीतील शेजारील रहिवाशांनीही याबाबत पालिकेला माहिती दिली. पालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित महिलेच्या घराची जंतूनाशक औषध फवारणी केली. मात्र, चार दिवस होवूनही अद्याप या ठिकाणचा परिसर पत्रे लावून सिल न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्थानिक नागरिक म्हणतायत आमच्या इथं रूग्ण आहे. एरिया सिल करा. मात्र नागरिकांना पालिकेकडून उत्तर दिले जातेय की आमच्याकडे अद्याप कोरोना पॉझिटिव्हचा रिपोर्ट आला नाही. दरम्यान या महिलेबरोबर इतर ठिकाणच्या वडगाव रस्ता आणि मरकळ रस्त्यावरिल कोरोना पाॅझिटिव्ह सापडलेले रूग्ण राहत असलेल्या ठिकाणी पत्रे लावून सिल करण्यात आले. मात्र या ठिकाणीच सिल का केले नाही याबाबत स्थानिक नागरिक अचंबित आहेत. याबाबत आळंदी पालिकेचे आरोग्य विभागातील अधिकारी किशोर तरकासे यांनी सांगितले की, आम्ही आळंदी ग्रामिण रूग्णालयाशी संपर्क साधला. मात्र महिलेचा रिपोर्ट अद्याप आला नसल्याचे सांगण्यात आले. मात्र स्थानिक नागरिकांच्या माहितीवरून संबंधित महिलेच्या घरी जावून आरोग्य विभागाने स्वच्छता केली. रिपोर्ट आल्यानंतर खातरजमा करून पुढील कार्यवाही केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

SCROLL FOR NEXT