Crime 
पुणे

पहिलाच वाढदिवस ठरला शेवटचा; निर्दयी काळाची चिमुकलीवर झडप!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तिचा पहिलाच वाढदिवस असल्यामुळे वाढदिवसाची घरात जय्यत तयारी सुरू होती. आई-वडिलांची धावपळ सुरू होती. मात्र, त्याचवेळेस खेळता-खेळता ती चिमुकली पाचव्या मजल्यावरील घरासमोरील गॅलरीतून खाली पडली, गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाचा तिची प्राणज्योत मालवली आणि काही तासांपूर्वी ओसंडून वाहणाऱ्या तिच्या घरातील आनंदाची जागा अश्रूंनी घेतली!

अवधिका गाथाडे (वय 1 वर्ष) असे या अपघातात मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. ही घटना सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे परिसरात बुधवारी (ता.30) सायंकाळी घडली. अवधिकाचे वडील एका खासगी कंपनीमध्ये काम करतात, तर आई गृहिणी आहे. तिला पाच वर्षांची मोठी बहीण आहे. बुधवारी अवधिका एक वर्षांची झाली होती. त्यामुळे तिचा पहिलाच वाढदिवस चांगला करण्यासाठी तिचे आई-वडील सकाळपासूनच झटत होते. सायंकाळी सात वाजता आई त्यांच्या इमारतीमध्ये राहणाऱ्यांना लेकीच्या वाढदिवसाचे निमंत्रण द्यायला गेली होती. तर वडील बाथरूममध्ये गेले होते.

त्याचवेळी अवधिका घरासमोरील गॅलरीमध्ये खेळत होती. ती खेळत असतानाच गॅलरीतून खाली पडली. त्यावेळी तेथील रहिवाशांनी अवधिका खाली पडल्याचे पाहिले, त्यांनी तिच्या आई-वडिलांना माहिती देत रुग्णवाहिका बोलावून तिला तत्काळ रुग्णालयामध्ये हलविले. अवधिकावर बुधवारी रात्री आणि गुरुवारी उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास उपचार सुरू असतानाच अवधिकाची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी दिली. 

अशी घ्या लहान मुलांची काळजी 
- लहान मुलांना घरात आणि सार्वजनिक ठिकाणी एकटे सोडू नका. 
- गॅलरी, पायऱ्या किंवा उंचवट्यांवर जाऊ देऊ नका. 
- खोल खड्डे, पाण्याची टाकी, स्विमींग पुलपासून दूर ठेवा. 
- वीजेची बटणे, तारा, फ्रीज, मिक्‍सर अशा वस्तूंपासून दूर ठेवा. 
- मोबाईल, लॅपटॉप अशा इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंपासून लांब ठेवा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2026

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

SCROLL FOR NEXT