Supriya sule 
पुणे

कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ट्विटला सुप्रिया सुळे यांच्याकडून ..  

संदीप नवले

पुणे : लॉकडाउनमुळे पुणे व नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणच्या बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे कांदा विकायचा कसा? असा प्रश्‍न कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शेतकऱ्यांची ही व्यथा तरुण शेतकरी भागवत दाभाडे पाटील यांनी ट्‌विटरद्वारे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडली. त्याची तातडीने दखल घेऊन त्यांनी कांद्यासाठी बाजार समित्या सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केल्याचे सांगितले.

पुण्यातील पुणे, चाकण, मंचर, जुन्नर, आळेफाटा, ओतूर, शिरूर येथील कांदा बाजार चालू- बंद होत आहे. नगरमधील घोडेगाव व राहुरी येथील कांदा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असल्याची तक्रार शेतकरी भागवत दाभाडे पाटील यांनी ट्‌विटरद्वारे खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली होती. त्यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेतली असून, कांद्यासाठी बाजार समित्या सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे म्हटले आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दाभाडे पाटील यांच्या ट्‌विटला उत्तर देताना सुळे यांनी म्हटले आहे की, नगर जिल्ह्यातील कांदा बाजार सुरू करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. सध्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, नगर, संगमनेर, कोपरगाव आणि श्रीरामपूर हे बाजार सुरू आहेत. उर्वरित राहुरी आणि घोडेगाव येथील बाजार देखील लवकरच सुरू होईल. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नगर जिल्ह्यापाठोपाठ पुण्यातील पुरंदर तालुक्‍यातही कांदा बाजार सुरू करावेत. तसेच, मराठवाड्यातील बहुतांशी भागातील शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यासंदर्भात तातडीने बाजार समित्या सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी अभिजित जगताप, श्‍याम प्रकाश जिगे यांनी ट्विटरद्वारे खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT