पुणे

आंबेगाव : कांद्याला हंगामातील विक्रमी बाजारभाव

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव : लोणी (ता. आंबेगाव) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात शेतकर्यांनी विक्रीसाठी आणलेल्या कांद्यास या हंगामातील विक्रमी प्रती १० किलोला २२५ रुपये बाजारभाव मिळाला तर खुल्या मोकळ्या कांद्यास प्रती १० किलोला १६९ रुपये बाजारभाव मिळाला असल्याची माहिती मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी दिली.

आंबेगाव तालुक्याचा पूर्व भाग व शिरूर तालुक्यातील पच्छिम भागातील शेतकर्यांना येथील उपबाजारात कांदा विक्रीसाठी आणणे सोयीचे पडत आहे येथे विक्री होणार्या कांद्यास बाजारभावही चांगला मिळत आहे. त्यामुळे येथील कांदा लिलावाला शेतकरी व व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आज येथे एकूण ६११ पिशवी कांदा व दोन ट्रॅक्टर ट्रोली खुला कांद्याची आवक झाली.

एक नंबर गोळा कांद्यास - प्रती १० किलोस २०१ ते २२५

रूपये बाजारभाव मिळाला, दोन नंबर कांद्यास - प्रती १० किलोस १७० ते २०० रूपये, तीन नंबर गोलटी कांद्यास - प्रती १० किलोस १०० ते १४० रूपये व चार नंबर बदला कांद्यास - प्रती १० किलोस ४० ते ७६ रूपये बाजारभाव मिळाला. सभापती देवदत्त निकम यांच्या स्वताच्या शेतातील विक्रीसाठी आलेल्या दोन ट्रॅक्टर ट्रोली खुला कांद्यास प्रती १० किलोस १६९ रुपये बाजारभाव मिळाला. कांदा लिलावामध्ये खरेदीदार व्यापारी मचिंद्र वाळुंज, महेंद्र वाळुंज, ज्ञानेश्वर वाळुंज, दत्तात्रय नरवडे, प्रदीप कोचर, सचिन टेमकर यांनी भाग घेतला तर लिलावाची व्यवस्था उपबजार कार्यालय प्रमुख अशोक राजापरे, गणेश गावडे यांनी पाहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT