online darshan of five famous ganapatis and prestigious ganapati in pune
online darshan of five famous ganapatis and prestigious ganapati in pune 
पुणे

Video : पुण्यातील मानाचे गणपतीही आता फेसबुक, इन्स्टाग्रामवर; भक्तांना मिळाणार लाईव्ह दर्शन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणेशोत्सवात दरवर्षी बाप्पांच्या दर्शनासाठी लागणाऱ्या रांगा, देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी यांवर कोरोनामुळे बंधने आली आहेत. परंतु, रस्त्यावर गर्दी न होता गणेशभक्तांना बाप्पांचे दर्शन होण्यासाठी आता पुण्यातील गणेश मंडळानी सोशल मीडिया आणि लाईव्ह दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि मंडळाच्या वेबसाईटवरून मंडळे भाविकांपर्यंत पोचू लागले आहेत. 

मानाचे पाच गणपती आणि प्रतिष्ठित गणेश मंडळे तंत्रज्ञानाचा आधार घेऊन रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या मंडळांच्या गणेश दर्शनासाठी मोठी गर्दी होते. पण कोरोनाचा धोका ओळखून पोलिस प्रशासनाने गर्दी रोखण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गणेश मंडळे भाविकांना ऑनलाइन गणेश दर्शन घडवित आहेत. 

कसबा गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी सांगितले, की गणेशयाग, सत्यविनायक पूजा, दैनंदिन आरती यांसह मंडळाचे धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रम भक्तांना पाहता यावेत, यासाठी ऑनलाइन व्यवस्था केली आहे. यातून भाविकांना रस्त्यावर येऊ नये, घरी बसून बाप्पांचे दर्शन घ्यावे, असे आवाहनही केले आहे. विशेषत: फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून हे कार्यक्रम प्रक्षेपित केले जात आहेत. याशिवाय कसबा गणपती मनामनात, घराघरात हा उपक्रम राबविला. शहरातील वेगवेगळ्या भागातील 121 कुटुंबांना कसबा गणपतीच्या प्रतिकृती दिल्या आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

'हुतात्मा बाबू गेणू' मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे म्हणाले, "भाविकांना घरी बसूनच बाप्पांचे दर्शन घ्यावे, असाच आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आमच्या 'नवसाचा गणपती' या फेसबुक पेजवरून लाईव्ह आरती आणि सफल दर्शन या संकेतस्थळावरून चोवीस तास दर्शन घेता येते. परंतु, भाविक येतात म्हणून लांबून घेतात. ही गर्दी टाळण्यासाठी देखील प्रयत्न करीत आहोत. यू ट्यूबवरही चित्रीकरण अपलोड करीत आहोत.'' 'तांबडी जोगेश्‍वरी'चे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांनी सांगितले, की मंडळाचे संकेतस्थळ आणि यू ट्यूबच्या माध्यमातून गणेश दर्शन भक्तांना घडवित आहोत. लाईव्ह दर्शनाची व्यवस्था देखील उद्यापासून सुरू होईल. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांसह मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या बहुतांश गणेश मंडळे ऑनलाइन दर्शन आणि लाईव्ह आरतीची व्यवस्था केली आहे. यामुळे भक्तांची गर्दी गेल्या वर्षीपेक्षा लक्षणीयरित्या कमी झाली आहे. केवळ पाच-दहा टक्के भाविक दर्शनासाठी येत आहेत. परंतु, ही गर्दी देखील होऊन नये म्हणून प्रयत्न सुरू असून, भाविकांना घरी बसून लाइव्ह दर्शन घेण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: दमदार सुरुवातीनंतर चेन्नई संघ सापडला अडचणीत; दुबेनंतर जडेजाही स्वस्तात बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

SCROLL FOR NEXT