court Sakal
पुणे

जपानमधून व्हिसीद्वारे शपथ : प्रतिज्ञापत्र न्यायालयाने धरले ग्राह्य

व्हिडिओ कॉन्फरन्सगद्वारे कौटुंबिक न्यायालयातील नाझरसमोर शपथ घेतल्यानंतर हे प्रकरण निकाली काढण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : घटस्फोट मंजूर करण्यासाठी आवश्‍यक असलेले प्रतिज्ञापत्र स्वतः हजर राहून किंवा दूतावासासमोर केलेले प्रतिज्ञापत्र सादर करणे शक्य नसल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सगद्वारे कौटुंबिक न्यायालयातील नाझरसमोर शपथ घेतल्यानंतर हे प्रकरण निकाली काढण्यात आले. यातील अर्जदार पत्नी ही जपानमधून ऑनलाईन हजर झाली होती. (Divorced)

कौटुंबिक न्यायालयाचे (Family Court) प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणातील जोडप्याने परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी दावा दाखल केला होता. मात्र पत्नी सध्या जपानमध्ये असल्याने तिला प्रत्यक्ष हजर राहणे शक्‍य नव्हते. पण न्यायालयीन पद्धतीनुसार तिने स्वतः: अथवा जपान दूतावासासमोर प्रतिज्ञापत्र केले तरच घटस्फोट मंजूर होणार होता. मात्र जपान दूतावासाने प्रतिज्ञापत्र तयार करून देण्यास नकार दिला. त्यामुळे तिची व्हीसीद्वारे शपथ घेत दावा निकाली काढण्यात आला. येथील कौटुंबिक न्यायालयात पहिल्यांदाच अशा प्रकारे घटस्फोट मंजूर करण्यात आला आहे.

रंजना आणि सुरेश (नावे बदलली आहेत) असे या पती-पत्नीचे नाव आहे. दोघेही उच्चशिक्षित आहेत. रंजना या सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहेत. सुरेश हे जर्मन भाषेतील मजकूर भाषांतरनाचे काम करतात. त्यांचा २०१५ साली पारंपारिक पद्धतीने विवाह झाला होता. दोघांमध्ये सतत वाद होत असल्याने सुरेश यांनी २०१६ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. कोरोनामुळे दोन वर्षे या दाव्यावर कोणताही आदेश झाला नाही.

याच कालावधीत रंजना या एका कंपनीमार्फत जपान गेल्या. दरम्यान सुरेश यांचे वकील ॲड. सूचित मुंदडा आणि ॲड. शीतल बारणे यांनी रंजना यांच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यावेळी केलेली चर्चा आणि ॲड. बारणे यांनी व्हॉट्‌सअप आणि फोनद्वारे रंजना यांच्या संपर्कात राहून समझोता घडवून आणला. त्यानंतर त्या परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यास ती तयार झाली. मात्र जपानवरून प्रतिज्ञापत्र कसे सादर करणार असा प्रश्‍न निर्माण झाला होता.

ऑनलाइन शपथ घेऊन प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. कौटुंबिक न्यायालयात पहिल्यांदाच असे प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरण्यात आले आहे. त्यामुळे जोडप्याच्या वेळेची बचत झाली आहे.

- ॲड. सूचित मुंदडा, रंजना आणि सुरेश यांचे वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway: कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेसचे डबे वाढणार, लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी होणार! रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Marriage Blessing Temple India : अजूनही 'सिंगल' आहात? लग्न ठरत नाहीये? 'या' प्राचीन मंदिरात कमरेला माळ बांधून फक्त 9 प्रदक्षिणा मारा, मग लग्न ठरलंच म्हणून समजा...!

Gudi Padwa 2026: यंदा गुढी पाडवा 18 की 19 मार्चला? जाणून घ्या तारीख, वेळ, शुभ मुहूर्त अन् सणाचे महत्त्व

Love Marriage : 'या' ठिकाणी मुलींच्या लव्ह मॅरेजला फूल पर्मिशन; आवडला पुरुष की कर लग्न! वाटेल तेव्हा घटस्फोट, शेजारील देशाशी आहे संबंध

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृ्त्यू

SCROLL FOR NEXT