पाडळे (जि. नगर) - येथे आपल्या मुळगावी ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरवताना ओम व आर्यन सकट. 
पुणे

एकच नंबर! ऊसतोड कामगारांच्या मुलांनाही ऑनलाईन शिक्षण

मीनाक्षी गुरव

पुणे - कोरोनामुळे हातातील काम बंद झाले; म्हणून आम्ही गावी परतलो. परंतु या सगळ्यात मुलांचे शिक्षण थांबू नये; म्हणून पोटाला चिमटा काढून चांगला मोबाईल घेतला. मोबाईलमधील आम्हाला काही कळत नाही. परंतु मुलांची शाळा सुरू झाल्याचा आनंद आहे, हे शब्द आहेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या ओम याचे वडील अमोल सकट यांचे!  ते ऊसतोडी कामगार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ओम सध्या नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्‍यातील पाडळे या त्याच्या मूळगावी राहत आहे. खरं तर त्याची शाळा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्‍यातील ठिकेकरवाडी येथे आहे. कोरोनामुळे हातातील काम गेल्याने त्याच्याही कुटुंबाला इतरांप्रमाणे गावचा रस्ता धरावा लागला. गेल्या सात-आठ वर्षापासून कामाच्या शोधात सकट कुटुंबीय नगरहून ठिकेकरवाडीत पोचले. या कुटुंबातील ओम आणि आर्यन ही मुले ठिकेकरवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. 

ऑनलाइनच्या माध्यमातून या शाळेनेही शिक्षण सुरू केले आहे. मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ग्रामपंचायत आणि पालकांनी पुढाकार घेऊन निधी उपलब्ध केला आहे. त्यातून २० टॅब उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे आता शाळेतील ओम, आर्यन सारख्या मुलांना घर बसल्या टॅबद्वारे शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ओम आणि आर्यन प्रमाणेच बाहेरगावी गेलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत टॅब पोचविण्यासाठी त्यांच्या पालकांना शाळेत बोलविण्यात आले होते.

टॅबमुळे प्रभावी शिक्षण
शाळेतील तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना टॅब दिले. सध्या शिक्षक झूम मीटिंग ॲपद्वारे मुलांना शिकवीत आहेत. यामध्ये मूळगावी गेलेले विद्यार्थी देखील गावातून शिक्षण घेत आहेत. टॅबमुळे प्रभावीपणे अभ्यास करणे शक्‍य होणार असल्याचे मुख्याध्यापक संतोष गडगे यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी ग्रामपंचायतीने एक लाख रुपये आणि उर्वरित रक्कम ग्रामस्थ आणि ग्रामस्थांच्या यात्रा वर्गणी फंडातून जमा करण्यात आली. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्यात आली. 
- संतोष गडगे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ठिकेकरवाडी 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Rashid Khan: पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यावर रशीद खानचा तीव्र संताप; म्हणाला, 'रमजानच्या पवित्र महिन्यात ही क्रूरता...'

IPL Kisse: वानखेडेवर शाहरुखचा संताप! विलासराव देशमुखांचा एक निर्णय अन् 5 वर्षांची बंदी, 2012 मधील IPL सामन्यात काय घडलं होतं?

NDA Rajya Sabha Majority : राज्यसभेत एनडीएची दमदार एंट्री; बहुमताचा आकडा पार, विधेयक मंजुरीसाठी येणार नाही अडचण

Nagpur News: विद्युत पोलवरून पडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू; देवलापारच्या वाघोली परिसरातील घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT