Online lecture series for lawyers in Lockdown 
पुणे

#Lockdown2.0 : लॉकडाऊनमध्ये वकिलांसाठी ऑनलाइन व्याख्यानमाला

सकाळवृत्तसेवा

पुणे : महत्त्वाच्या कायद्यांमध्ये झालेले बदल, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निकाल व त्याचे परिणाम आणि प्रॅक्टिस करताना येणाऱ्या विविध अडचणींचे निरसन करण्यासाठी वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळावे यासाठी जन आदालत संस्थेतर्फे ऑनलाइन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाऊनमुळे सध्या न्यायालयात केवळ महत्त्वांच्या प्रकरणांची सुनावणी होत आहे. त्यामुळे बहुसंख्य वकील सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरीच आहेत. या वेळेचा प्रॅक्टिससाठी लाभ व्हावा म्हणून ही ऑनलाइन व्याख्यानमाला घेण्यात येत आहे.व्याख्यानमालेचे उदघाटन महाराष्ट्र बार कौन्सिलचे अध्यक्ष ऍड. सुभाष घाटगे यांचे हस्ते करण्यात आले. प्रथम पुष्प गुपंथाना त्यांनी बार कौन्सिलच्या आगामी उपक्रमांबद्दल माहिती दिली. परिपूर्ण वकील कसे बनावे या संदर्भात ऍड. उदय वारुंजीकर यांनी मार्गदर्शन केले. तर ऍड. भास्करराव आव्हाड यांनी 'पुराव्याचा कायदा आणि प्रमुख तरतुदी' विशद केल्या. तसेच हिंदू विवाह कायद्यातील अनौरस संतती अधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालायाने दिलेल्या निर्णयासहित माहिती दिली. तर अन्य सत्रात स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आणि महत्वाच्या दुरुस्त्या यावर प्रकाश टाकला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ मुरारका  यांनी चेक बाउन्सच्या दाव्याबाबत केस लॉज सहित माहिती दिली. ऍड. सागर नेवसे यांनी सामाजिक वकिली विषयावर सत्र घेतले. ऍड. मकरंद आडकर यांनी आर्ट ऑफ अरगुमेंटवर मार्गदर्शन केले. ही व्याख्यानंमाला 25 मेपर्यंत चालू राहणार आहे.एकूण 30 विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. राज्यातील अनेक वकील या ऑनलाईन व्याख्यानमालेत सहभागी होत आहे. लॉकडाउनच्या काळात या उपक्रमामुळे अभ्याससाठी त्याचा उपयोग होत आहे, अशी माहिती जुन अदालत संस्थेचे अध्यक्ष ऍड. सागर नेवसे यांनी दिली. या व्याख्यानमालेत सहभागी होण्यासाठी 9850600984 या क्रमांकावर संपर्क साधावा.

पुणेकरांनो, सावधान! कोरोनाच्या बळींचे झालंय शतक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT