Online registration for MHADA flat release 5000 flats available in Pune sakal
पुणे

पुणे : म्हाडाच्या सदनिका सोडतीसाठी उद्यापासून ऑनलाइन नोंदणी

पुण्यात म्हाडाच्या पाच हजार सदनिका उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) सदनिकांची सोडत काढली जाणार आहे. या सोडतीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना येत्या गुरुवारपासून (ता.९) आॅनलाइन नोंदणी करता येणार आहे. या सोडतीसाठी पुणे शहर व परिसरात म्हाडाच्या पाच हजार ६८ सदनिका उपलब्ध असल्याचे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी सांगितले.

या उपलब्ध असलेल्या एकूण सदनिकांपैकी म्हाडाच्या विविध गृहनिर्माण योजनांतील शिल्लक राहिलेल्या २७८, बांधकाम व्यावसायिकांकडून २० टक्के कोट्यातून उपलब्ध झालेल्या २ हजार ८४५ आणि म्हाडाच्या सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील १ हजार ९४५ अशा सदनिकांचा समावेश आहे. या सदनिकांच्या सोडतीत सहभागी होण्यासाठी अगोदर आॅनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. या आॅनलाइन नोंदणीचा शुभारंभ येत्या गुरुवारी (ता.९) दुपारी दोन वाजता मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केला जाणार आहे. यावेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Mahapalika Nivadnuk: नाशिक महापालिकेचा गड कोण जिंकणार? दोन ठाकरे, भाजप की शिंदे? भविष्यासाठी निर्णायक असलेली निवडणूक

Teacher Recruitment : शिक्षक भरतीबाबत शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय; पवित्र पोर्टलवरील भरतीत खासगी शाळांना डावलले? संस्थाचालकांचा आक्षेप

ऑनलाइन ओळख, ऑफलाइन धोका! पुण्यातील तरुणी कोल्हापूरला पोहोचली, पण शेवटी घडलं धक्कादायक!

Pune News:'पुण्यात स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी रस्त्यावर'; जाहिरात उशिरा आल्यामुळे वयोमर्यादेला फटका, सरकारकडून हालचाल नाही!

सनी देओलच्या गर्लफ्रेंडसोबतच धर्मेंद्र यांनी दिलेला किसिंग सीन, 21 वर्ष लहान होती अभिनेत्री, एका सीनमुळे नातं सापडलेलं वादात

SCROLL FOR NEXT