training by barti 
पुणे

मोफत ऑनलाइन सैन्य, पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण; अर्जाची प्रक्रिया सुरु

सकाळ डिजिटल टीम

पुणे - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या वतीने पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी नि:शुल्क ऑनलाइन मार्गदर्शन 25 फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया बार्टीच्या www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड तसेच ई-बार्टी अॅप मधील M-governance अंतर्गत पोलिस भरती लेखी परीक्षा मार्गदर्शन या लिंकवर सुरु आहे. 

पोलिस भरती पूर्व लेखी परीक्षेकरिता दोन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार हा कालावधी वाढवण्यात येईल. दर शनिवारी, रविवारी तसेच सरकारी सुटीच्या दिवशी मार्गदर्शन वर्ग बंद राहतील. पोलिस भरती पूर्व लेखी परीक्षेकरिता असलेले सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता चाचणी असे एकूण चार अभ्यास घटकांचे दिवसाला दोन तास ऑनलाइन प्रशिक्षण असेल. प्रत्येक विषयाला स्वतंत्र मार्गदर्शक असतील. 

बार्टीच्या 'Barti Online' या युट्यूब चॅनलवरूनही हे प्रशिक्षण वर्ग थेट प्रसारीत करण्यात येतील. प्रशिक्षण परस्परसंवादी स्वरूपाचे असेल. प्रशिक्षणामध्ये विषयाचा आवाका, मागील वर्षी विचारण्यात आलेले प्रश्न, जास्त प्रश्न विचारले जाणारे घटक अशा घटकांचा सखोल अभ्यास करण्याची पद्धत, वाचन साहित्य, मार्गदर्शकांची टिपणे (नोट्स) याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाईल.

उमेदवारांच्या शंकांचे निरसन इ-मेलद्वारे करण्यात येईल. बार्टी संस्थेद्वारे आयोजित ऑनलाइन प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या उमेदवारांचा त्यांच्या जिल्ह्यात प्रकल्प अधिकारी आणि समतादूत यांच्या माध्यमातून शारीरिक प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतील, अशी माहिती बार्टीच्या वतीने देण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT